आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • 388 Districts In The Country Are Affected, 39% In 10, 69% Positive In 50 Districts

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाची 4 केंद्रे:देशात 388 जिल्हे बाधित, 10 मध्ये 39%, 50 जिल्ह्यांत 69 %पॉझिटिव्ह

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
 • कॉपी लिंक
 • देशातील २५ टक्के बाधित मुंबई, जयपूर, अहमदाबाद, इंदूरमध्ये; आतापर्यंत २,५८४ पॉझिटिव्ह रुग्ण
 • दिल्लीत दक्षिण भागात सर्वाधिक संसर्ग, येथे ३२० रुग्ण

देशात ७ दिवसांत कोरोना विषाणूचा संसर्ग दुपटीवर गेला आहे. गेल्या सात दिवसांत (६ ते १३  एप्रिल) संसर्गाचे प्रमाण २४ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. हा वेग असाच राहिल्यास पुढील सात दिवसांत देशात कोरोनामुळे बाधितांची संख्या २० हजारांहून जास्त होऊ शकते. देशातील ३८८ जिल्ह्यांत आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. १० जिल्ह्यांत ३९ टक्के, तर टॉप ५० जिल्ह्यांत ६९ टक्के रुग्ण आढळले आहेत. 

कोरोनाचे टॉप १० जिल्हे  

 • मुंबई / महाराष्ट्र - 1540
 • जयपूर / राजस्थान - 361
 • इंदूर / मध्यप्रदेश - 363
 • अहमदाबाद / गुजरात - 320
 • द. दिल्ली / दिल्ली - 320
 • हैदराबाद / तेलंगणा - 267
 • पुणे / महाराष्ट्र - 209
 • ठाणे / महाराष्ट्र - 190
 • कासरगोड / केरळ - 168

जयपूर :  येथे ३६१ बाधित, ७ दिवसांत २९६ % रुग्ण वाढले

 • जयपूरमध्ये एकूण ३६१ बाधित रुग्ण आहेत. ७ दिवसांत २७० रुग्ण वाढले. म्हणजे या काळात ८३ टक्के रुग्ण वाढले. येथे रामगंज केंद्र आहे.
 • जयपूरमध्ये रामगंज कोरोनाचे केंद्र ठरले आहे. येथे आेमानहून परतल्यानंतर एका व्यक्तीमुळे संसर्ग पोहोचला. होम क्वारंटाइन असतानाही व्यक्ती भटकंती करत होता.
 • हा व्यक्ती एक दिवस मित्रांसोबतही भटकला होता. २३ मार्च रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

इंदूर : संपूर्ण राज्यातील ६० टक्के बाधित याच भागात

 • इंदूरमध्ये सात दिवसांत २०१ पॉझिटिव्ह वाढले. सोमवारी ५६ लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह . एका दिवसात मोठा आकडा.
 • ३६ जागांवर १४७४ लोक क्वारंटाइन आहेत. येथे असरावखुदमध्ये ५८, रानीपुरा-२४, तारागंज-२२ पॉझिटिव्ह आढळले.
 • मध्य प्रदेशात एकूण ६०७ बाधित. त्यापैकी इंदूरमध्ये ३६३ रुग्ण. म्हणजे राज्यातील ६० टक्के बाधित इंदूरमध्ये आहेत.

अहमदाबाद : ३२० रुग्ण, ७ दिवसांत ८२ टक्के रुग्ण वाढले

 • अहमदाबादमध्ये एका आठवड्यात ३८ रुग्ण सापडले होते. आता रुग्णसंख्या ३२० झाली. म्हणजे ८२ टक्के असा रुग्णवाढीचा वेग आहे.
 • येथे ११ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील जमालपूर, रखियाल, बापूनगर, दरियापूर, दाणीलीमडा, शाहपूर, जुहापुरासह परिसराला सील करण्यात आले आहे.
 • अहमदाबादमध्ये मास्क घालणे अनिवार्य आहे. विना मास्क व्यक्ती आढळल्यास त्यास ५ हजार दंड भरावा लागणार आहे.

मुंबई : महाराष्ट्रात ७ दिवसांत 192 टक्यांनी रुग्ण वाढले

 • मुंबईत ७ दिवसांत ११५१ रुग्ण वाढले. येथे दोन दिवसांत अनुक्रमे २४२ व २१७ रुग्ण आढळले. हे दोन दिवसांत जास्त आहे.
 • मुंबईत २० टक्के रुग्ण दक्षिण भागात आहेत. त्यात एलफिन्सिटन, वरळी, परेलचा समावेश आहे. सहा दिवसांत मुंबईत ६०० वाढले आहेत.
 • महाराष्ट्रात पहिले एक हजार रुग्ण ३० दिवसांत झाले. परंतु, पुढील एक हजार सहा दिवसांत वाढले.
बातम्या आणखी आहेत...