आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 3.9 Lakh Crore. The French Company Will Invest 25% In Adani's Company In Green Energy Project

सर्वात मोठ्या ग्रीन एनर्जी प्रोजेक्टमध्ये अदानी:3.9 लाख कोटी रु. गुंतवणार, फ्रान्सची कंपनी अदानींच्या कंपनीचा 25% हिस्सा घेणार

अहमदाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील ९ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी ग्रीन हायड्रोजनमध्ये जगातील सर्वात मोठी कंपनी होण्याची तयारी केलेली आहे. याच अनुषंगाने त्यांनी फ्रान्सची ऊर्जा कंपनी टोटल एनर्जीजशी करार केला आहे. या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत टोटल एनर्जीज, अदानी न्यू इंडस्ट्रीज लि.(एएनआयएल)मध्ये अदानी एंटरप्रायझेसची २५% हिस्सेदारी खरेदी करेल. अदानी ग्रुपने ग्रीन हायड्रोजन व्यवसायासाठी एएनआयएल स्थापन केली आहे. कंपनीचे उद्दिष्ट २०३० पूर्वी १० लाख टन वार्षिक ग्रीन हायड्रोजन निर्मिती करणे आहे. यासाठी अदानी १० वर्षांत ५,००० कोटी डॉलर(३.९ लाख कोटी रु.) गुंतवणूक करणार आहे.

अदानी एंटरप्रायझेसचे शेअर ६.६६% उसळले
अदानी-टोटलमध्ये कराराचे वृत्त आल्यानंतर मंगळवारी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर ६.६६% पर्यंत उसळले. शेवटी ५.५३% वाढीसह २,१९६.५० रु.वर बंद झाला. या कंपनीचे शेअर गेल्या एका वर्षात ३७.१६% वधारले. अदानींची संपत्ती ७.२५ लाख कोटी रु. आहे. ही वर्षात १.२८ लाख कोटी रु.वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...