आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या आकड्यांमुळे चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे 3939 नवे रुग्ण आढळले आहेत. यानंतर, कोरोनाचे सक्रिय रुग्ण 19 हजार 748 झाले असून एकूण रुग्णांची संख्या 4 कोटी 31 लाख 68 हजार 151 झाली आहे. कोरोनामुळे 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, त्यानंतर एकूण मृतांचा आकडा 5 लाख 24 हजार 651 वर पोहोचला आहे. सध्या, कोरोनाचा संसर्ग दर 0.05% आहे, तर बरे होण्याचा दर 98.74% नोंदवला गेला आहे. दैनिक पॉझिटिव्हिटी रेट 0.84% आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 0.67% होता.
दिल्लीत कोरोनामुळे दोन मृत्यू
गुरुवारी दिल्लीत ३७३ नवे रुग्ण आढळले आहेत, तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या 1490 झाली असून एकूण मृतांची संख्या 26 हजार 212 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 448 लोक कोरोनामधून बरे होऊन घरी गेले आहेत.
सोनिया गांधींनंतर आता प्रियंका गांधीही कोरोना पॉझिटिव्ह
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनंतर आता प्रियंका गांधी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे आहे. प्रियांका यांनी सांगितले की, त्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका यांनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. त्यांनी जवळच्या सर्वांना आवश्यक प्रोटोकॉल पाळण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी 1 जून रोजी सोनियांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच दिवशी सेवादलाने आयोजित केलेल्या गौरव यात्रेच्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या.
केरळमध्ये केसेसमध्ये वाढ
केरळमध्ये कोरोनाची नवीन प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत 1370 नवीन रुग्ण आढळले असून, त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 6129 झाली आहे. गुरुवारी 6 मृत्यूची नोंद झाली असून, त्यानंतर कोरोनामुळे एकूण मृत्यू 69 हजार 753 वर पोहोचला आहे. केरळमध्ये 15 हजार 518 टेस्ट झाल्या आहेत.
महाराष्ट्रात सलग दुस-या दिवशी रुग्णांचा आकडा 1 हजारांवर गेला आहे
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोरोनाचे 1045 नवीन रुग्ण आढळून आले असून, तीन महिन्यांनंतर सलग दुसऱ्या दिवशी रुग्णांची संख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे 1 रुग्णाचा मृत्यू झाला असून, त्यानंतर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 861 झाली आहे. कोरोनाचे सक्रिय रुग्ण 4 हजार 559 असून 517 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात २६ हजार ५४८ चाचण्या टेस्ट झाल्या आहेत.
मास्क घालणे बंधनकारक
महाराष्ट्रातील कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सांगितले की, कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत राहिल्यास मास्कचा वापर अनिवार्य करावा लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.