आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:मागील 24 तासात आढळले 39,496 नवे रुग्ण तर 35,124 बरे झाले, 541 रुग्णांचा मृत्यू; गेल्या 23 दिवसात सक्रिय रुग्णांमध्ये 1.14 लाखाने घट

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केरळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या सर्वात जास्त

देशात गेल्या 24 तासात म्हणजेच शुक्रवारी 39,496 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, 35 हजार 124 लोक उपचार घेत बरे झाले तर यात 541 लोकांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतदेखील दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी उपचार घेणाऱ्यांच्या आकडेवारीत 3 हजार 831 ने वाढ झाली.

जुलै महिन्यात गेल्या 23 दिवसात 5 वेळा सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. यापूर्वी 7, 14, 20 आणि 21 जुलै रोजी यामध्ये वाढ झाली होती. दरम्यान, देशातील सक्रिय रुग्ण संख्येत 1.14 लाखाने घट झाली आहे.

केरळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या सर्वात जास्त
देशातील सक्रिय रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापूर्वी 30 जून रोजी देशात 5 लाख 17 हजार 460 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु होता. या आकडेवारीत घट होत 23 जुलै रोजी 4 लाख 3 हजार 312 वर पोहोचला होता. सध्या देशात सर्वात जास्त सक्रिय रुग्ण केरळ (1.35 लाख) राज्यात असून त्यानंतर महाराष्ट्राचा (94,769) नंबर येतो.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 39,496
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 35,124
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 541
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.13 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 3.04 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.20 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 4.03 लाख
बातम्या आणखी आहेत...