आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानपूर हिंसाचाराचा कट लखनऊत शिजला:दंगल भडकवण्यासाठी यूट्यूबचा वापर झाला, 4 आरोपी लखनऊमध्येच दडून बसले होते

लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर हिंसाचाराचा कट लखनऊत शिजला होता. हिंसा भडकवण्यासाठी येथील एव्हीपी-24 नामक यूट्यूब चॅनलचा वापर करण्यात आला. हिंसा भडकल्यानंतर 4 मुख्य आरोपी याच चॅनेलच्या कार्यालयात दबा धरून बसले होते. कानपूर पोलिसांनी शनिवारी या चौघांच्याही मुसक्या आवळल्या. लखनऊ पोलिसांना या कारस्थानाची कोणतीही कल्पना नव्हती हे विशेष.

कानपूर दंगलीचा मुख्य आरोपी हयात जफर हाश्मी आपला सहकाही जावेद अहमद खान याच्या माध्यमातून एव्हीपी-24 (एशियन व्हॉइस पोस्ट) न्यूज चॅनलच्या संपर्कात आला होता. या चॅनेलमध्ये वकील सुल्तान सिद्दीकी, इम्रान व जावेद अहमद पार्टनर आहेत. सुल्तान चॅनेलचा सर्वात मोठा भागीदार आहे. त्याचे ऑफीस कैसरबाग पोलिस ठाणे हद्दीतील कलेक्ट्रेटजवळील बेगम हजरत महल पार्कच्या समोरील पांडेय कॉम्प्लेक्समध्ये आहे. कानपूर दंगलीचा मुख्य आरोपी हाश्मी जावेदचा खास दोस्त आहे.

कानपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर पोलिस रस्त्यावर उतरले. ते फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून दंगेखोरांचा शोध घेत आहेत.
कानपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर पोलिस रस्त्यावर उतरले. ते फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून दंगेखोरांचा शोध घेत आहेत.

चॅनेलद्वारे सुरू होता संस्थेचा प्रचार-प्रसार

सूत्रांच्या माहितीनुसार, हाश्मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्या एमएमए फँस असोसिएशनचा प्रचार-प्रसार करत होते. 3 जून रोजी कानपूरमध्ये हिंसाचार भडकावण्यासाठी त्याने याच प्लॅटफॉर्मचा वापर केला. येथील रणनिती यशस्वी झाल्यानंतर तो कानपूरला गेला होता. दंगलीनंतर रात्री 10 च्या सुमारास जावेद तथा मोहम्मद राहील व मोहम्मद सुफियान या अन्य 2 आरोपींसोबत लखनऊला परतला.

वकील मित्राची घेत होता मदत

हयात जफर हाश्मी व जावेदचा हेतू यशस्वी झाल्यानंतर ते लखनऊच्या आपल्या यूट्यूब चॅनेलच्या कार्यालयात परतले. तिथे ते देशविरोधी कट कारस्थान रचत होते. त्यांचा मुख्य पार्टनर सुल्तान व्यवसायाने वकील आहे. त्यामुळे पोलिस त्याच्या कार्यालयावर छापेमारी करणार नाहीत असा त्याला विश्वास होता. जवळपास झालेही तसेच होते. चारही आरोपी दंगलीनंतर राजधानी लखनऊला परतले. पण, स्थानिक पोलिसांनी त्यांच्यावर हात टाकला नाही. पण, कानपूर पोलिसांनी सर्विलांसच्या मदतीने त्यांचा माग काढून त्यांच्या मुसक्या आवळल्या. याची कोणतीही खबरबात लखनऊ पोलिसांना नव्हती.

चॅनेलचा मालक म्हणाला -घटनेची माहिती नव्हती

एव्हीपी-24 चॅनलचे मालक सुल्तान सिद्दीकी यांनी सांगितले की, जावेद त्यांचा भागीदार आहे. शुक्रवारी रात्री तो काही वेळ थांबण्याची माहिती देत आपल्या 3 मित्रांसह कार्यालयात आला. त्याची तिसरा पार्टनर इम्रानशी चर्चा झाली. तो रात्री कार्यालयातच थांबला. त्यांचा कानपूर दंगलीत हात असल्याचे आपल्याला माहिती नव्हते. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, जावेद व हाश्मी स्वतःचा बचाव करण्यासाठी सुल्तानकडून कायदेशीर सल्ला घेत होता.

बातम्या आणखी आहेत...