आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधूंना मारहाण करणारे 4 अटकेत, 35 बेपत्ता:5 हजार देण्यास नकार दिल्यामुळे पसरवली मुले चोरीची अफवा, दारुसाठी मागितले होते पैसे

भिलाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात मुले चोरण्याच्या संशयावरून साधूंना बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. यात योगेंद्र साहू उर्फ छोटू, सत्यनारायण चक्रधारी, भूपेंद्र वर्मा उर्फ कान्हा व सितेंद्र महतो यांचा समावेश आहे. अद्याप 35 संशयित बेपत्ता आहेत. घटनेची वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी दिव्य मराठीची टीम ग्राउंड झिरोवर गेली. तिथे स्थानिकांनी आरोपींची ओळख दाखवण्यास नकार दिला. पण सर्वांनी साधूंना अत्यंत निर्दयीपणे मारहाण करण्यात आल्याची कबुली दिली. त्यांच्यावरील मुले चोरी करण्याचा आरोपही चुकीचा आहे.

घटनास्थळावर अजूनही साधूंचा रूमाल पडला आहे.
घटनास्थळावर अजूनही साधूंचा रूमाल पडला आहे.

भिलाईच्या चरोदा भागात

भिलाईच्या चरोदा भागात ही घटना घडली. तेथील एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर संपूर्ण प्रकरण समजून सांगितले. ते म्हणाले की, भूपेंद्र वर्मा उर्फ कान्हा नामक मुलाने साधूंना थांबवून 5 हजार रुपयांची मागणी केली. साधूंनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर कान्हा व त्याच्या मित्रांनी साधूंना मारहाण केली. त्यांनी साधूंना या भागात मुले चोरणारी टोळी सक्रिय असल्याचे सांगत पैसे न दिल्यास चोरीचा आळ घेऊन तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली.

घटनास्थळासमोरील घर व त्यातील सदस्य.
घटनास्थळासमोरील घर व त्यातील सदस्य.

साधू त्यानंतरही पैसे देण्यास तयार झाले नाही. त्यामुळे योगेंद्र, सत्य नारायण, कान्हा व सितेंद्र महतो यांनी तिन्ही साधूंनाी बेल्ट व लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू4 केली. त्यावेळी तेथून जव्हारेची मिरवणूक जात होती. हे भांडण पाहून मिरवणुकीतील अनेकजण तिथे जमले. कान्हा व त्याच्या मित्रांनी या जमावाला हे साधू मुले चोरणारे असल्याचे सांगितले. त्यानंतर जमावाने संतप्त होऊन या साधूंना बेदम मारहाण केली. त्यात ते जबर जखमी झाले.

प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पीयम सिंह यांनी साधूंना गंभीर जखमा झाल्याचे सांगितले.
प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पीयम सिंह यांनी साधूंना गंभीर जखमा झाल्याचे सांगितले.

भिलाई पोलिसांचे अपयश उजेडात

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील साधू राजबीर सिंह, अमन सिंह व श्याम सिंह यांना मारहाण होण्याची ही घटना 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली. भिलाई -3 पोलिस ठाण्याचे शिपाई अमित टंडन यांनी दुपारी 12.55 वा. या साधूंना सुपेला रुग्णालयात दाखल केले. तिथे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पीयम सिंह यांनी या तिन्ही साधूंच्या डोके व शरीराच्या अन्य भागांत गंभीर जखमा झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना सिटी स्कॅन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण एसपी दुर्ग यांच्यापासून लपवून ठेवले. पण या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली.

आरोपींनी रचली दुसरी कहाणी

4 आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर एसपरी डॉ. अभिषेक पल्लव यांनी स्वतः त्यांची चौकशी केली. आरोपींनी सांगितले की, साधू मुलांना प्रसाद देत होते. मुले चोरीच्या संदर्भात त्यांना चौकशी करण्यात आली असता ते चालढकल करत होते. त्यांच्याकडे आधार कार्डही नव्हते. त्यामुळे त्यांना संशयाच्या आधारावर मारहाण करण्यात आली. याऊलट साधूंकडे आधार कार्ड होते. त्यांनी पोलिसांना हे कार्ड दाखवले.

राज्यसभा खासदाराकडून घटनेचा निषेध

राज्यसभा खासदार सरोज पांडेय यांनीन या घटनेप्रकरणी एक निवेदन जारी केले आहे. त्यात ते म्हणाले - दुर्ग मुख्यमंत्र्यांचा गृह जिल्हा आहे. तिथे साधूंवर झालेल्या हल्ल्याची पोलिसांनी दखल घेतली नाही. माध्यमांतून या घटनेची माहिती मिळाली आहे. कवर्धातही अशाच प्रकारची हिंसक घटना घडली होती. काँग्रेस सरकारच्या काळात अशा घटनांत वाढ झाली आहे. सरकारने आपल्या राजधर्माचे पालन केले पाहिजे. या प्रकरणी दोषी पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे.

दरम्यान, छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश दिलेत.

बातम्या आणखी आहेत...