आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारवाई:इन्स्टंट कर्ज अ‍ॅप घोटाळ्यात चिनी नागरिकासह 4 अटकेत; 4 कंपन्या, 11 अ‍ॅप, 1,100 कर्मचाऱ्यांद्वारे झाली होती फसवणूक

हैदराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकाने कर्जाची परतफेड करूनही त्याला धमकीचे फोन करून बदनामी करण्यात आली होती

अ‍ॅपद्वारे इन्स्टंट कर्ज देण्याच्या घोटाळ्यात सायबराबाद पोलिसांनी क्युबेवाे टेक्नाॅलाॅजी प्रायव्हेट लिमिटेडच्या (स्कायलाइन) काॅल सेंटरवर धाड टाकली. या कारवाईत एका चिनी नागरिकासह ४ जणांना अटक केली. ही टाेळी ११ इन्स्टंट कर्ज अ‍ॅप, ४ कंपन्या आणि १,१०० कर्मचाऱ्यांद्वारे फसवणूक करत हाेती.

मुख्य आरोपी जिक्सिया झांग हा चिनी नागरिकासह उमापती काही आरोपी फरार आहे. त्यांच्याकडून २ काेटी रुपये, १ लॅपटॉप व ४ मोबाइल जप्त केले. अ‍ॅपद्वारे एकाने १.२० लाखांचे कर्ज घेतले हाेते. २ लाख रुपयांची परतफेड करूनही त्याला धमकीचे फोन करून बदनामी करण्यात आली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser