आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लीग सामना अर्ध्यावर साेडणे पडले महागात:केरला ब्लास्टर्सवर 4 काेटींची दंडात्मक कारवाई; जाहीर माफी मागण्याचे आदेश

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू एफसी संघाविरुद्ध सामना अर्ध्यावर साेडणे केरला ब्लास्टर्स टीमला चांगलेच महागात पडले. याप्रकरणी अखिल भारतीय फुटबाॅल महासंघाने थेट केरला संघावर ४ काेटींचा दंड ठाेठावला. तसेच संघावर सुपर लीगच्या १० सामन्यांची बंदी घातली आहे. याशिवाय या संघाने जाहीरपणे माफी मागण्याचे आदेशही दिले आहे. यामुळे आता केरला संघ चांगलाच अडचणीत सापडला.

गत महिन्यात ३ मार्च राेजी बंगळुरू आणि केरला यांच्या सुपर लीगचा एलिमिनेटर सामना रंगला. या सामन्यात बंगळुरू संघाच्या सुनील छेत्रीने फ्री किकवर गाेल केला. मात्र, हा गाेल चुकीच्या पद्धतीने केल्याचा आराेप केरला संघाने केला. पंचांच्या व्हिसलपूर्वीच छेत्रीने गाेल केला, असेही या संघाने म्हटले आहे. मात्र, पंचांनी हे आराेप फेटाळून लावत गाेलला अधिकृत असल्याचे जाहीर केले. याच प्रकरणी संघाने थेट सामना अर्ध्यावर साेडून मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, यातून या संघाने महासंघाच्या नियमाचे उल्लंघन केले असल्याचे समाेर आले.