• Home
  • Business
  • 4.5 crore shops open in the country after 55 days, difficulties in work due to laborers gone

रुळावर येणारी अर्थव्यवस्था / 55 दिवसांनंतर देशात 4.5 कोटी दुकाने सुरू, मजुरांच्या घर परतीमुळे कामात अडचणी : कॅट

  • व्यापाऱ्यांची संघटना कॅटशी संबंधित 65 टक्के रिटेल दुकानदारांनी सुरू केले काम
  • 33% कर्मचाऱ्यासह काम सुरू, ग्राहकांची आवक 25 ते 60 %
  • रेड झोन वगळता अन्य झोनमध्ये कामकाजात गती, वाहतूक अडथळ्यामुळे मालात कमतरता

दिव्य मराठी

May 20,2020 09:42:05 AM IST

नवी दिल्ली/ जयपूर/छत्तीसगड/अहमदाबाद/औरंगाबाद. टाळेबंदी-४ दरम्यान देशभरात ५५ दिवसांपासून बंद जवळपास ६५% दुकाने मंगळवारी उघडली. लहान दुकानदारांची देशव्यापी संघटना कॅटनुसार देशभरात त्यांचे ७ कोटीहून जास्त दुकानदार सदस्य आहेत. मात्र, दिल्लीसह देशातील कोणत्याही वाणिज्यिक बाजारात कोणता विशेष व्यापार झाला नाही. दुकानदारांनी दीर्घावधीच्या टाळेबंदीनंतरर दुकाने उघडली होती. त्यामुळे दुकानाच्या स्वच्छतेत जास्त व्यग्र राहिले. याशिवाय दुकानांत काम करणारा स्टाफही कमी राहिला. कन्फेडेरेशन आॅफ ऑल इंडिया ट्रेडर्स(कॅट)चे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, मोठी दु:खद बाब आहे की, कॅट एका मोठ्या व्यापारी समुदायाचे प्रतिनिधित्व करत आहे. मात्र, सरकारच्या २० लाख कोटी रुपयांच्या मदत पॅकेजमध्ये सरकारने लहान दुकानदारांकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. कॅटचे बहुतांश सदस्य शहरी, ग्रामीण आणि निमशहरी भागात व्यावसायिक बाबी करतात. यापैकी बहुतांश जणांकडे मर्यादीत साधने आहेत. टाळेबंदी आणखी लांबू शकते,अशी त्यांना भीती आहे. मात्र, कोरोना महारोगराईनंतर देश पुन्हा उभा दुकाने उघडण्याच्या सम-विषम सूत्रावर फेरविचार करण्याची मागणी केली आहे. या व्यवस्थेमुळे मंगळवारी केवळ ५ लाख दुकानेच उघडू शकली.

वेगवेगळ्या नियमांमुळे अडचणींत वाढ

सर्व राज्य आपआपल्या पद्धतीने दुकाने उघडण्याचे नियम करत आहेत. यामुळे व्यापाऱ्यांना त्रास होत आहे. . मजूर घरी गेल्यामुळेही व्यापारात अडचण येत आहे. कारण, माल उतरण्यात आणि तो लावण्यासाठी मजुरांची गरज भासते. करणारे रोजंदारही कमी आहेत. - प्रवीण खंडेलवाल, सरचिटणीस, कॅट

महाराष्ट्रात २२ मेपर्यंत टाळेबंदी-३ च्या अटी लागू राहतील, सर्वाधिक संसर्ग येथेच

भारतात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारने टाळेबंदीत सध्या सूट देण्यास नकार दिला आहे. टाळेबंदी-३ च्या अटी शुक्रवार(२२ मे)पर्यंत लागू राहतील. राज्य सरकारने मंगळवारी नवे मार्गदर्शकतत्त्व जारी केले. त्यानुसार, महाराष्ट्रात आता कंटेन्मेंट झोनशिवाय केवळ दोन रेड आणि ग्रीन झोन असतील. हॉटेल आणि मॉल तीनही झोनमध्ये बंद राहील. कंटेंन्मेंट झोनमध्ये सर्व प्रकारची दुकाने बंद राहतील. रेड झोनमध्ये मद्याची होम डिलिव्हरी होईल. ग्रीन झोनमध्ये मद्याची दुकाने सुरू होतील. रेड आणि ग्रीनमध्ये स्विगी, झोमॅटोद्वारे खाद्याची होम डिलिव्हरी सुरू होईल. या दोन्ही झोनमध्ये बँकांच्या शाखा सामान्य पद्धतीने काम सुरू करतील.

छत्तीसगडमध्ये ८० टक्के दुकाने विविध अटीसह उघडली, ५०% ग्राहक

छत्तीसगडमध्ये जवळपास ८०% दुकाने शासनाद्वारे निर्धारित विविध अटींसह सुरू झाली. सर्व प्रकारचे दुकाने उघडण्यास परवानगी मिळाल्याने व्यापाऱ्यांसोबत ग्राहकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांच्या हिशेबाने श्रेणी आणि रस्त्याच्या कडेच्या दुकानांसाठी दिवस निश्चित केले आहेत.व्यापाऱ्यांकडून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षेचे सर्व उपाय योजले आहेत. निर्जंतुकीकरण आणि फिजिकल डिस्टंन्सिंगवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. छत्तीसगड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष जितेंद्र बरलोटा यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सध्या दुकानात कर्मचाऱ्यांची संख्या कमी अाहे. त्यामुळे कमी स्टाफसह सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत व्यवसाय केला जात आहे. मंगळवारी ग्राहकांची संख्या सामान्य दिवसांच्या तुलनेत ५०% राहिला.

जयपूरमध्ये ४० टक्के दुकाने सुरू, मात्र सध्या व्यवसाय २५ टक्केच

राजस्थानमध्ये टाळेबंदी-४ साठी राज्य सरकारचे मार्गदर्शकतत्त्व जारी होण्यासोबत मंगळवारी जयपूरमध्ये सराफा, ऑटोमोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स, कपड्यासह बहुतांश व्यवसाय सुरू झाले. मात्र, संचारबंदी असल्याने जुन्या जयपूरमध्ये व्यवसाय बंद राहिला. दुसरीकडे, संचारबंदीच्या भागात राहणारे व्यापारी आणि कर्मचाऱ्यांकडे पास न मिळाल्यामुळे जयपूरचे सुमारे १.२५ लाख दुकाने व शोरूमपैकी ४०% सुरू झाले. जयपूर व्यापार महासंघाचे अध्यक्ष सुभाष गोयल म्हणाले, अशा स्थितीत व्यवसाय सामान्य दिवसांच्या तुलनेत जवळपास २५% राहिला. सराफा ट्रेडर्स कमेटी, जयपूरचे अध्यक्ष कैलास मित्तल यांनी सांगितले की, संचारबंदीग्रस्त सराफा बाजार वगळता शहरात ज्वेलरीची दुकाने शोरूमही मंगळवारी सुरू होती. जयपूरमध्ये ८,००० ज्वेलरी शोरूम व दुकाने आहेत.

गुजरातमध्ये ६०% दुकानांत काम सुरू, सम-विषममध्ये सुरू होतील दुकाने

कोरोना महारोगराईत केंद्र सरकारने टाळेबंदी-४ ला ३१ मेपर्यंत लागू केली आहे. अन्य झोन म्हणजे ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये मंगळवारपासून व्यापार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यानंतर गुजरातमध्ये जवळपास ६०% लहान-मोठ्या दुकानांत कामकाज सुरू झाले. यामध्ये ज्वेलर्सच्या शोरुमचा समावेश आहे. सामान्य दिवसांच्या तुलनेत मंगळवारी राज्यात उघडलेल्या दुकानांत ग्राहकांची संख्या ६०% राहिली. गुजरात सरकारच्या मार्गदर्शकतत्त्वानुसार, दुकानदार आणि कार्यालयात ३३% स्टाफसह कामकाज सुरू केले जाऊ शकते. याशिवाय दुकाने सम-विषममध्ये सुरू करण्याचे आदेश बजावले आहेत. दुकानदार सकाळी ७ ते सायं.४ पर्यंत व्यापार करू शकतील. राज्यात २०% दुकानदार असे आहेत ज्यांच्याकडे साठा नाही. त्यांनी ऑर्डर दिल्या आहेत, मात्र माल येण्यात एक आठवडा लागू शकतो.


X