आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 4 Days After The Rumor Of Death, Chhota Rajan Defeated Kelly Corona; Tihar Was Shifted From AIIMS To Jail

डॉन जिंवत आहे:मृत्यूच्या अफवेनंतर 4 दिवसांनी छोटा राजनने केली कोरोनावर मात; एम्समधून तिहार तुरुंगात हलवण्यात आले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दाऊदच्या मैत्रीने वाढली ताकद, 1993 ब्लास्टनंतर झाले एकमेकांचे शत्रू

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने कोरोनावर मात केली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूच्या अफवा आल्या होत्या. परंतु, अफवेच्या 4 दिवसानंतर छोटा राजनने कोरोनाविरुद्धच्या लढाईत विजय मिळवला आहे. दरम्यान, त्याला मंगळवारी एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून आता तिहार तुरंगात रवाना करण्यात आले आहे.

छोटा राजनला तिहारच्या तुरंग नंबर 2 मध्ये कडक सुरक्षा बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. छोटा राजनला 22 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्यानंतर तुरुंगातील रुग्णालयात त्याला भरती करण्यात आले. परंतु, त्याची प्रकृती बिघडल्यानंतर 25 एप्रिलला एम्स रुग्णालयात हलवण्यात आले होते.

उपचारादरम्यान राजनची मृत्यूची अफवा
छोटा राजनची 7 मे रोजी उपचारादरम्यान मृत्यूची अफवा आली होती. त्यानंतर एम्स प्रशासनाकडून या घटनेचे खंडन करण्यात आले होते. परंतु, मृत्यूच्या अफवेनंतर 4 दिवसांनी छोटा राजनने कोरोनावर मात केली आहे.

छोटा राजनवर 65 पेक्षा जास्त गुन्हे दाखल
छोटा राजनचे खरे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे. त्याचा जन्म मुंबईच्या चेंबूर भागात टिळक नगर वस्तीत झाला. शाळा सोडल्यानंतर छोटा राजनने मुंबईत चित्रपटाची तिकिटं ब्लॅक करणे सुरू केले. यादरम्यान, तो राजन नायर टोळीत सामील झाला. अंडरवर्ल्डच्या जगात नायरला 'बडा राजन' म्हणून ओळखले जात होते.

कालांतराने, राजेंद्र (छोटा राजन) बडा राजनचा जवळचा झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर तो टोळीचा मुख्य झाला. छोटा राजन फरार होता, तेव्हा त्याच्यावर भारतात 65 पेक्षा जास्त फौजदारी खटले दाखल झाले होते. ही प्रकरणे बेकायदेशीर वसुली, धमकी, प्राणघातक हल्ला आणि खुनाच्या प्रयत्नांचे होते. त्याच्यावर 20 हून अधिक लोकांचा खून केल्याचा आरोप होता. पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी त्याला दोषी ठरविण्यात आलेहोते. त्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

दाऊदच्या मैत्रीने वाढली ताकद, 1993 ब्लास्टनंतर झाले एकमेकांचे शत्रू
राजन नायर टोळीत काम करत असताना त्याला छोटा राजन असे नाव पडले. त्यावेळी त्याची अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी ओळख झाली. दाऊदसोबत आल्यानंतर त्याचा गुन्ह्यांचा आलेख वाढला गेला होता. दोघांनी मिळून मुंबईत रिकव्हरी, खून, तस्करी अशी कामे करण्यास सुरवात केली. 1988 मध्ये राजन दुबई येथे गेला.

यानंतर, दाऊद आणि राजन यांनी जगभरात बेकायदेशीर कामे करण्यास सुरवात केली, परंतु 1993 मध्ये बाबरीच्या घटनेनंतर मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडले तेव्हा राजनने आपला मार्ग वेगळा केला. त्या स्फोटांमध्ये दाऊदचा हात असल्याचे जेव्हा त्याला कळले तेव्हा तो त्याचा शत्रू बनला. त्याने स्वत: ला दाऊदपासून वेगळे केले आणि एक नवीन गॅंग बनवली.

बातम्या आणखी आहेत...