आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना काळ : देशाचा आँखो देखा हाल:दिल्लीत ४ लाख कुटुंबांना किरायामुळे अडचण, तर खान मार्केटमध्ये महिन्याचा किराया १० लाख रु.; विक्री घटली, दुकाने बंद करण्याची वेळ

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजधानी दिल्लीत लाखो रुपये किराया देणाऱ्यांपासून छोट्या व्यापाऱ्यापर्यंत सर्वजण अडचणीत

सम-विषम व अनलॉक परिस्थितीत दिल्लीतील दुकाने गेल्या १५-२० दिवसांपासून सुरू झाली आहेत. परंतु ग्राहकांऐवजी दुकान मालकांचा तगादा जास्त आहे. ते किराया वसुलीसाठी येत आहेत. बाजारात ज्यांच्या प्रतिष्ठेचा, थाटमाटाचा दबदबा होता. ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अशोक मार्केट, सुभाष रोड व रामनगर मार्केटचे प्रमुख के. के. बल्ली यांनी सांगितले, दिल्लीत सुमारे चार लाख घर व दुकान मालकांची परिस्थिती खूप बिकट झाली आहे. कारण किरायाच्या उत्पन्नांवरच त्यांचे घर चालते. दुसरीकडे दुकानदारांचेही किराया देणे थकले आहे. त्यामुळे तेही अडचणीत आले आहेत. अनेकांनी किरायाही देण्याची एेपत उरली नसल्याने त्यंानी दुकाने बंद ठेवली आहेत. किरायावरून वाद न्यायालयात गेले आहेत. काही लोक आपसात तडजाेड करून समस्या सोडवण्याच्या प्रयत्नात आहेत. आिशयातील सर्वात महागडे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या खान मार्केटमध्ये किरायाच्या वादावरून एका दुकानदाराने उच्च न्यायालयात धाव घेतली. किराया देणे अवघड आहे. कृपया किराया माफ करावा, अशी त्याची याचिकेत मागणी आहे. तर तुम्हाला लीज-अॅग्रीमेंटमधील अटी मान्य कराव्या लागतील, असे न्यायालयाने म्हटले. हे एकमेव प्रकरण नाही, अशी अनेक प्रकरणे आहेत.

खान मार्केटमध्ये सर्वात प्रथम रेस्तरांची सुरुवात करणारा सिदेवोक कॅफे बंद झाला. कारण अशा परिस्थितीत पुढील सहा महिने तरी सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नव्हती. १५६ दुकानांपासून खान मार्केटची सुरूवात झाली. नंतर ७४ निवासी भागात आणखी ५० दुकाने झाली. येथे ४६४ ते ५३४ चौरसफूटांची दुकाने आहेत. याचा किराया दरमहा दहा लाख रुपये इतका आहे. येथील ६०% दुकाने वडिलोपार्जित तर ४०% दुकाने किरायावर आहेत. ‘मेन स्ट्रीट्स अक्रॉस द वर्ल्ड २०१९’ अहवालात खान मार्केटमध्ये दरवर्षीचा किराया प्रतिचौरस मीटर १७४४५ रुपये इतका सांगण्यात येतो. यावरून येथे व्यापारी उलाढाल किती होत असावी, याचा तुम्ही अंदाज लावू शकता. याबरोबरच उर्वरित दिल्ली-एनसीआरमध्येही तयार कपड्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. दररोज हजारो जीन्स तयार करणारे अनेक छोटे कारखाने बंद पडले आहेत. यंत्रे कारागिरांची वाट पाहात आहेत. देशभरात रेडिमेड गार्मेंटचा पुरवठा करणाऱ्या गांधीनगरमध्ये लॉकडाऊनपूर्वी पाय ठेवायला जागा नव्हती. तेथील १४-१५ हजार दुकानांत आता कोणी पाऊलही ठेवलेले नाही. मौजपूर मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या कबीरनगर मध्ये जीन्सचा बाजार आहे. तेथे भरमसाठ किराया व कारागिरांची कमतरता व बाजारात घटत चाललेली मागणी यामुळे हा व्यवसाय संकटात आला आहे. डेक्सी व यूएके जीन्सचे फॅब्रिकेटर वसीम यांनी सांगितले, आमची कोणतीही संघटना नाही. यामुळे फॅब्रिकेटरची संख्या किती, याची कल्पना नाही. परंतु या भागातील घराघरांत हा उद्योग आहे. मध्यम वर्गियांच्या जीन्सचा होलसेल दर ४०० रुपये इतका होता. तो आता ३०० रुपयावर आला. एका फॅब्रिकेटरकडे दहा मशिन असतील व तो २०० जीन्स तयार करतो. एक जीन्स शिवण्यासाठी ८० रुपये मिळतात. हायफर जीन्सचे शादाब यांनी सांगितले, ५० मशिन्सवर दररोज १००० जीन्स तयार करतो. दुकानाचा किराया १.५० लाख रुपये, गोडावूनचे भाडे ४० हजार रुपये व फॅब्रिकेटेड यार्डाचे १.२५ लाख रुपये किराया आहे. दिल्लीच्या या भागातील ज्या दुकानदारांशी आम्ही बोललो तो किरायाचे गणित करतो आहे.

गांधीनगरातील अशोक मार्केटमध्ये गारमेंटचे दुकानदार दिनेश खंडेलवाल दुकानात बसलेले होते. त्यांना चिंता दुकान कसे चालेल? तर त्यांचे दोन कामगार अशा परिस्थितीत नोकरी कशी टिकेल या चिंतेत आहेत. दिनेश म्हणाले, आमचे दुकान दोन महिन्यांपासून बंद होते. आता उघडले तर व्यवसाय घटला आहे. एक लाख रुपये किराया आहे. तीन महिन्यापासून तोही थकला आहे. घरचा हप्ता, मुलाचे शिक्षण कसे होईल. दुकान बंद करण्याची पाळी आहे.

३० हजारांपेक्षा जास्त किराया असेल त्यांनी दोन महिने 33% व त्याहून कमी ७५% किराया द्यावा

किरायाच्या वादामुळे चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजने एक समन्वय समिती तयार केली आहे. अशोक मार्केट, सुभाष रोड व रामनगर मार्केटचे प्रमुख श्रीकिशन गोयल व देसराज मल्होत्रा यांनी एक फॉर्म्युला आखला आहे. ज्याचा किराया ३० हजारापेक्षा कमी असेल त्यांना २५% सूट असेल. त्याहून जास्त असेल तर एक तृतीयांश किराया द्यावा. यास किरायेदार तयार नाहीत. आमच्याकडे पैसेच नाहीत. हा निर्णय जागेच्या मालकांच्या बाजूने आहे. आमच्यासाठी यात काहीच नाही.

बातम्या आणखी आहेत...