आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 4 Lakh Soldiers Of Army, Air Force Will Jointly Handle Security Of 2300 Km Border From Jammu To Bhuj From Jaipur's Western Theater Command

आता तीन सेना, एक नियंत्रण:जयपूरच्या पश्चिम थिएटर कमांडद्वारे सेना, वायुदलाचे 4 लाख जवान मिळून सांभाळतील जम्मू ते भुजपर्यंत 2300 किमी सीमेची सुरक्षा

जयपूर (डी.डी. वैष्णव)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपल्या तिन्ही सेनांना एका कमांडद्वारे चालवण्याचा आराखडा तयार, गेल्या वर्षी झाली हाेती याची घोषणा

कारगिल युद्धातून धडा घेत भारतीय लष्कर मोठी सुधारणा करत आहे. याची घोषणा गेल्या वर्षी झाली होती. आता आराखडा समोर येत आहे. भारतही अमेरिका, रशियाप्रमाणे चार थिएटर कमांड बनवेल, यात तिन्ही सेना एका छताखाली एकाच प्रमुखाच्या आदेशावर चालतील. पाकला तोंड देणारी पश्चिम कमांड जयपूरला असेल. स्थापना ऑगस्ट २०२२ ला होईल. ही कमांड ४ लाखांपेक्षा जास्त जवानांची असेल. जम्मू ते पंजाब, राजस्थान व गुजरातपर्यंत २३०० किमी लांब सीमेची सुरक्षा तिची जबाबदारी असेल. सध्या पश्चिम भागात सेना व वायुदल ५ कमांडमध्ये विभागले आहे. पश्चिम कमांडचे नेतृत्व ले. जनरल किंवा एअर मार्शल दर्जाचा अधिकारी करेल.

एक्सप्लेनर
सुरुवात झाली. जेव्हा जर्मनी, इटली, जपान व मित्रदेश अमेरिका, रशियासारख्या देशांचे सैन्य वेगवेगळ्या खंडांत एकमेकांसमोर हाेते तेव्हा सर्वात आधी युरोपियन थिएटर शब्द आला. अमेरिकेने व्हिएतनाम युद्धानंतर संपूर्ण जगाचीच वेगवेगळ्या थिएटरमध्ये विभागणी केली. यात पॅसिफिक, एशियन, मध्यपूर्वसह १९ थिएटर बनवले. त्यांच्यात तिन्ही सेना एकत्रपणे युद्ध करतात.
गरज का? स्वातंत्र्यानंतर फक्त दोन कमांड लखनऊत पूर्व, तर पुण्यात दक्षिण कमांड होती. नंतर १९ झाल्या. अनेकदा त्यांच्यात समन्वयाची अडचण येते. चीन व पाकिस्तानच्या दुहेरी धोक्याचा सामना करण्यासाठी थिएटरायझेशन सध्याची गरज आहे.
न झाल्यास काय नुकसान? एकीकृत योजना व युद्ध न होण्याने १९६२ च्या चीन युद्धात वायुदलाचा वापर न होणे आणि १९९९ च्या कारगिल युद्धात वायुदल १५ दिवस उशिरा सहभागी होण्यासारखे परिणाम होतील.
योजना कोणत्या आधारे बनवली? कारगिल समीक्षा समितीने २००१ मध्ये आणि २०१६ मध्ये ले. जनरल डी. बी. शेकटकर यांच्या समितीने दोन आघाड्यांवर लढण्यासाठी थिएटरायझेशनची शिफारस केली होती, जी आता मान्य झाली आहे. यात तिन्ही सेनांच्या गरजांकडे एकत्र लक्ष दिले जाईल. म्हणजे शस्त्र खरेदी वेगळी होणार नाही.
किती थिएटर कमांड्स असतील? सध्या चार असतील. वेस्टर्न थिएटर कमांड (पाकिस्तान सेंट्रिक), ईस्टर्न थिएटर कमांड (ईशान्य सीमा सेंट्रिक), मेरिटाइम थिएटर कमांड (समुद्री सुरक्षा), नॉर्दर्न थिएटर कमांड (चीन सेंट्रिक).

बातम्या आणखी आहेत...