आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 4 seater Aircraft Crashes Due To Bad Weather; The Pilot Jumped With A Parachute But Did Not Survive

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर प्रदेश:खराब वातावरणामुळे 4 सीटर एअरक्राफ्ट क्रॅश; पायलटने पॅराशूट घेऊन उडी मारली पण जीव वाचला नाही

आजमगड8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमवारी सकाळी आजमगड जिल्ह्यातील सरायमीर परिसरात अपघात झाला
  • क्रॅश झाल्यानंतर एअरक्राफ्टचे तुकडे झाले, पायलटचा मृतदेह शेतात आढळला

उत्तर प्रदेशातील आजमगड जिल्ह्यात सोमवारी 4 सीटर एअरक्राफ्ट क्रॅश होऊन शेतात कोसळले. अपघातात एका ट्रेनी पायलटचा मृत्यू झाला आहे. पायलटने पॅराशूट घेऊन उडी मारली होती, पण त्याचा जीव वाचला नाही. कोणार्क सरन असे पायलटचे नाव आहे. खराब वातावरणामुळे अपघात झाल्याची माहिती आहे.

400 मीटर दूर शेतात आढळला मृतदेह

अपघात सोमवारी 11.30 वाजता आजमगड जिल्ह्यातील सरायमीरमध्ये घडला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, सकाळी 11:20 वाजता एक एअरक्राफ्ट आकाशातून शेतात कोसळले. विमानाला आग लागलेली होती आणि कोसळल्यानंतर एक मोठा स्फोट झाला.

विमानाला आग लागल्यानंतर पायलटने उडी पॅराशूट घेऊन उडी मारली होती, पण त्याचा जीव वाचू शकला नाही. पायलट कोणार्क सरन यांचा मृतदेह विमानापासून 400 मीटर दूर शेतात आढळला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

एअरक्राफ्ट टीबी-20 ने अमेठीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमीमधून उड्डाण घेतली होती. मऊपर्यंत चक्कर मारुन विमान परत येणार होते. या विमानात एक ट्रेनी पायलट होता. सकाळी 11.11 वाजता विमानाचा एटीसीसोबत संपर्क तुटला आणि काही मिनीटातच विमान क्रॅश झाले.

बातम्या आणखी आहेत...