आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधानसभा निवडणूक:4 राज्ये, एका केंद्रशासित प्रदेशात निवडणुकीची घोषणा, निकाल 2 मे रोजी... समजून घ्या, या राज्यांतील मतदानाचा कल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणूक आयोगाने शुक्रवारी ४ राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ८ टप्पे, आसाम ३ तर तामिळनाडू, केरळ व पुद्दुचेरीत एकाच टप्प्यात मतदान हाेईल. बंगाल व आसामात पहिल्या टप्प्यात २७ मार्चला मतदान होईल. सर्व राज्यांचे निकाल २ मे रोजी लागतील. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरांनी ही माहिती दिली. पुद्दुचेरीत ३० जागांवर मतदान होईल.

केरळ : काँग्रेसच्या मतांत भाजपची मुसंडी, पण सत्तेत येणे कठीण
४ दशकांपासून दरवेळी सरकार बदलते. डाव्यांची एलडीएफ सत्तेत, तर काँग्रेसची यूडीएफ विरोधात आहे. काँग्रेसला उच्चवर्णीय व ओबीसींची मते मिळतात. त्यात भाजपने मुसंडी मारली आहे. त्यांची जेवढी मते भाजपकडे जातील, तेवढे काँग्रेसचे नुकसान होईल. शबरीमला मुद्दा भाजपच्या बाजूने.

तामिळनाडू : अद्रमुकशिवाय भाजपची वाढ अशक्य आहे
काँग्रेसच्या मदतीने द्रमुक मजबूत स्थितीत आहे. दुसरीकडे, भाजपने शशिकलांमुळे दोन गटांत विभागलेल्या अद्रमुकसोबत युतीसाठी अटी घातल्या, त्यामुळे युतीबाबत संशय आहे. पण पुद्दुचेरीत भाजप व अद्रमुक मिळून समीकरण बनले तर याच विश्वासावर तामिळनाडूत दोन्ही पक्ष सोबत येऊ शकतात.

बंगाल : काँग्रेस आक्रमक नसणे तृणमूलसाठी फायदेशीर ठरणार
२०१९ ची लोकसभा निवडणूक विधानसभेच्या हिशेबाने पाहिली तर तृणमूलला १६४ व भाजपला १२१ जागांवर आघाडी होती. बहुमतासाठी १४८ जागा आवश्यक. काँग्रेस व डावे पक्ष आक्रमक प्रचार करत नाहीत, कारण त्यांनी मते वाढवली तर नुकसान तृणमूलचेच. तृणमूलचे नुकसान झाल्यास भाजपला फायदा होऊ शकतो.

...घोषणेच्या आधी पुद्दुचेरीत पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये घट, तामिळनाडूत कर्ज माफ
निवडणूक वेळापत्रक जाहीर होण्याआधी पुद्दुचेरीत उपराज्यपालांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट २% घटवला. बंगालमध्ये अकुशल मजुरांची रोजची मजुरी ११४ वरून २०२ रुपये, अर्धकुशल मजुरांची मजुरी १७२ वरून ३०३ रु. केली आहे. कुशल मजुरांची नवी श्रेणी बनवून मजुरी ४०२ रुपये केली आहे. तामिळनाडू सरकारने घोषणा केली की, सहकारी बँकांनी शेतकरी आणि गरिबांना जे गोल्ड लोन दिले आहे ते माफ केले जाईल.

एका जिल्ह्यात तीन टप्प्यांत मतदान का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री शहा यांच्या हिशेबाने निवडणूक तारखांची घोषणा झाली आहे. एका जिल्ह्यात तीन टप्प्यांत मतदान का घेतले जात आहे?’-ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

मतदान वेळापत्रक
कोणत्या राज्यामध्ये केव्हा असेल मतदान
बंगाल: 27 मार्च-29 एप्रिलपर्यंत

टप्पा तारीख जागा
पहिला 27 मार्च 30
दुसरा 1 एप्रिल 30
तिसरा 6 एप्रिल 31
चौथा 10 एप्रिल 44
पाचवा 17 एप्रिल 45
सहावा 22 एप्रिल 43
सातवा 26 एप्रिल 36
आठवा 29 एप्रिल 35

आसाम: 27 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत
पहिला 27 मार्च 47
दुसरा 1 एप्रिल 39
तिसरा 6 एप्रिल 40
- केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरीत ६ एप्रिलला मतदान होणार आहे.

- रोड शोत फक्त पाचच वाहने. - ५ जणच घरोघर प्रचार करतील. - अर्ज भरण्यास दोनच लोक. - मतदान वेळ १ तास वाढवली. - बूथवर मास्क व सॅनिटायझर.

बातम्या आणखी आहेत...