आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 4 Year Old Girl Attacked In Anjali Vihar, Youth Saved Her Life By Running; Condition Critical

अंगावर काटा आणणारा व्हिडिओ:भोपाळमध्ये भटक्या श्वानांनी चिमुकलीला बनवले शिकार, 4 वर्षांच्या मुलीला श्वानांच्या टोळीने घेरले; डोके, कान अन् हाताचे तोडले लचके

भोपाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भटक्या श्वानांनी चार वर्षांच्या मुलीचे लचके तोडले आहे. बागसेवनियां परिसरात या मुलीवर 5 भटक्या श्वानांनी हल्ला केला. मुलीच्या डोक्यावर, कानाला आणि हातावर खोल जखमा झाल्या आहेत. चेहऱ्यासोबतच पोट, कंबर आणि खांद्यावरही जखमा होत्या.

ही घटना शनिवारी दुपारी 4.15 वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. मुलीचे वडील राजेश बन्सल हे कव्हर कॅम्पसमध्ये बांधकाम सुरू असलेल्या घरात मजूर म्हणून काम करतात. शनिवारी सायंकाळी त्यांची चार वर्षांची मुलगी गुड्डी जवळच खेळत असताना कळपात आलेल्या श्वानांनी तिच्यावर हल्ला केला. ती धावत आली, पण श्वानांनी तिला घेरले आणि लचके तोडायला सुरुवात केली. एका तरुणाने दगडफेक करून श्वानांना हुसकावून लावले. रक्तबंबाळ झालेल्या गुड्डीला जेपी रुग्णालयात नेण्यात आले. येथून तिला हमीदिया रुग्णालयात रेफर करण्यात आले. उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.

आईच्या मांडीवर जखमी मुलगी. तिला खोलवर जखमा झाल्या आहेत.
आईच्या मांडीवर जखमी मुलगी. तिला खोलवर जखमा झाल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर सक्रिय होतात कर्मचारी

भोपाळमध्ये श्वानांची दहशत वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोलार, तुळशीनगर, अयोध्यानगर, करोदसह अनेक भागात श्वानांचे हल्ले होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अंजली विहार फेज-2 मध्येही श्वानांची दहशत आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या, मात्र आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.भटक्या श्वानांना पकडण्याचा विषय आला की, महामंडळाचे कर्मचारी नियमांचा हवाला देऊन नियमांची पायमल्ली करतात. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना जेपी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी जायचे होते, त्याआधीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येथून सुमारे 10 श्वान पकडले होते.

बातम्या आणखी आहेत...