आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 4 Years Of Notebandi : Counterfeit Notes 2 Times Lower, Cash Transactions Up 50%; Black Money Has No Effect

नोटबंदीची 4 वर्षे:बनावट नोटा 2.5 पटीने कमी, रोख व्यवहार 50% वाढले; काळ्या पैशावर परिणाम नाही

धर्मेंद्रसिंह भदौरिया | नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नोटबंदीच्या आधीच्या तुलनेत डिजिटल व्यवहार 5 पट

नोटबंदीच्या ४ वर्षांनंतर देशात पेमेंट करण्याची पद्धत बदलली आहे. बँकेत बनावट नोटा आढळणे अडिच पट कमी झाले आहे. तसेच देशात नोटबंदीपासून सुमारे ५० टक्क्यांपेक्षा जास्त रोकड असली तरी डिजिटल व्यवहार पाचपट वाढला आहे. मात्र, काळ्या पैशांवर त्याचा जास्त परिणाम झाला नाही.

पेमेंटची आकडेवारी बघता ऑक्टोबर महिन्यात यूपीआय प्लॅटफॉर्मवरुन ३.९ लाख कोटी रुपयांचा व्यवहार झाला. तर एटीएममधून २.४-२.५ लाख कोटी काढले जात आहेत. कोरोनाआधी यूपीआयवर रोज चार कोटींचा व्यवहार व्हायचा. तर ऑक्टोबरमध्ये सात कोटींचा रोज व्यवहार होऊ लागला.

एनपीसीआयचे अध्यक्ष दिलीप आसबे यांच्यानुसार नोटबंदीनंतर ऑनलाइन व्यवहारात वाढ झाली. मात्र, कोविड नंतर तो वेगाने वाढला. या काळात ऑन लाइन पेमेंट कंपन्यांची संख्याही दुपटीपेक्षा जास्त वाढली. भीम अॅपचा वापर न वाढल्याबद्दल त्यांनी सांगितले की, भीम अँकर व स्टार्टर स्टार्टर म्हणून आले होते. ज्या बँकांकडे अॅप नाही त्यांना बँकिंग सुविधा देणे हा भीम अॅपचा हेतू होता. खासगी कंपन्यांप्रमाणे आमचा हेतू स्पर्धा करणे नव्हता. सध्या यूपीआयवर दरमहा सुमारे दोन अब्जपेक्षा जास्त व्यवहार होत आहे. ऑनलाइन व्यवहारात आणखी वाढ होईल असे आम्हाला वाटते. लवकरच एक दिवसात एक अब्ज व्यवहाराच्या दिशेने जाऊ. तर पेमेंट काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, अॅमिरिटस व फिनटेक कन्व्हर्झेस काउन्सिलचे अध्यक्ष नवीन सूर्या यांनी सांगितले, बँक वगळता सध्या डिजिटल पेमेंटच्या सुमारे ७५ ते ८० कंपन्या नोंदणीकृत आहेत. तर नोटबंदी आधी अशा कंपन्यांची संखा ४० ते ५० होती. सूर्या सांगतात, की सध्या देशात शंभर कोटी लोक डिजिटल पेमेंटचा वापर करतात. नोटबंदीच्या आधी सुमारे ६० कोटीच डिजिटल पेमेंट करायचे. तसेच पॉइंट ऑफ सेल (पॉस) यंत्र दुप्पट झाली आहेत. आधार आधारीत पेमेंट सिस्टमचे व्यवहारही वाढले आहेत. ग्रामीण भागात मायक्रो एटीएममधून पैसे काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

काळ्या पैशांवरील पुस्तकाचे लेखक, अर्थतज्ञ प्रा. अरुण कुमार यांनी सांगितले की, महामारीमुळे काळ्यापैशांबद्दल काहीच सांगता येणार नाही. मात्र, नोटबंदीचा काळ्या पैशांच्या अर्थव्यवस्थेवर काहीच परिणाम झाला नाही. कारण रोकडमुळे काळ्यापैशांची निर्मिती थांबत नाही. दुसरे म्हणजे रोकड संपत्तीचा भाग आहे, संपत्तीचा केवळ टक्के भाग रोख स्वरुपात असतो.

बातम्या आणखी आहेत...