आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 4 Young Men Reciting Shiva Chalisa At Taj Mahal Waved Saffron Flag; CISF Arrested

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ताज परिसरात भगवा:ताजमहलमध्ये शिव चालीसेचे पठण करत फडकवला भगवा झेंडा, चौघांविरोधात गुन्हा दाखल

आग्रा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विजयादशमीच्या दिवशी ताजमहलला शिवमंदिर म्हणत भगवा फडकावला होता

आग्र्यातील ताजमहलमध्ये भगवा झेंडा फडकवणे आणि शिव चालीसेचे पठण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हिंदू जागरण मंचचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी CISF ने धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

4 जानेवारीला गौरव ठाकुर, सोनू बघेल, ऋषी लवानिया आणि विष्णु कुमार ताजमहलमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी भगवा झेंडा फडकवला आणि शिव चालीसेचे पठण करत व्हिडिओ बनवला. यानंतर हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. घटनेची माहिती मिळताच, CISF च्या जवानांनी त्यांना पकडले आणि ताजगंज पोलिसांकडे सोपवले. दरम्यान, पोलिस अधिक्षक उमेश चंद्र त्रिपाठी यांनी सांगितले की, ही दुसरी वेळ आहे, जेव्हा या चौघांनी ताजमहलमध्ये भगवा फडकावला आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये दसऱ्यादिवशी भगवा फडकावला होता.

विजयादशमीच्या दिवशी ताजमहलला शिवमंदिर म्हणत भगवा फडकावला होता

ऑक्टोबरमध्ये विजयादशमीच्या दिवशी गौरव ठाकुरने ताजमहल परिसरात भगवा झेंडा फडकावून शिव चालीसेचे पठण केले होते. त्या वेळेसही CISF जवानांनी गौरवला पकडले होते. परंतू, चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले. त्यावेळेस गौरव म्हणाला होता, शिव मंदिर तेजोमहालय आहे, यामुळे शिव चालीसेच पठण करुन झेंडा फडकावला.

बातम्या आणखी आहेत...