आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागव्हाचे पीठ खुले ३८-४० रुपये आणि ब्रँडेड पॅकेटमध्ये ४५-५५ रुपये प्रति किलो िवकले जात आहे. जानेवारी २०२२ मध्ये जो भाव होता, त्याच्या तुलनेत हा ४० टक्क्यापेक्षाही जास्त आहे. कमोडिटी विश्लेषकांच्या मते, सरकारने गव्हाचा साठा बाजारात खुला केला नाही तर पिठाचे भाव वाढू शकतात. खरे तर गेल्या काही काळापासून गव्हाचे भाव सलग वाढत आहेत. निर्यातीवर बंदी असूनही जानेवारीत गव्हाचे भाव ७-१० टक्के वाढले आहेत. चालू हंगामासाठी सरकारचे किमान खरेदी मूल्य (एमएसपी) २,१२५ रुपये प्रतिक्विंटल आहे. मात्र मंगळवारी इंदूरमध्ये गव्हाचे भाव ३१,०० रुपये प्रतिक्विंटलच्या पातळीवर पोहोचलेे. दिल्लीत गहू ३,१५० रुपये विकला गेला, तर अनेक भागात ३२०० रुपयांच्या वर गेला. त्याचा परिणाम पीठावरच आणि त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या किमतीवरही दिसून येत आहे.
गहू, सर्व उत्पादनांच्या किमती १ वर्षात ५५ टक्के वाढल्या
जिन्नस/प्रॉडक्ट्स जाने.-२२ जाने.-23 तेजी
गहू बाजार मूल्य 2,570 3,150 5.5%
पीठ (खुले) 25-27 38-40 22.6%
पीठ (ब्रँडेड) 38-40 45-55 48-52%
रवा 24-26 35-37 19-38%
मैदा 22-24 34-36 42-46%
ब्राऊन ब्रेड (400 ग्रा.) 30-35 40-45 50-55%
व्हाइट ब्रेड (400 ग्रा.) 28-30 35-40 29-33%
(गव्हाचे भाव प्रति क्विंटल, इतर उत्पाद प्रति रुपये किलो)
१ महिन्यात २०% वाढले भाव
गहू महाग झाल्याने पीठ, मैदा, रव्याचे भावदेखील महिनाभरात १५-२०% पर्यंत वाढले आहेत. सरकारकडून खुल्या बाजारात गहू विकण्याची आशा करणारे गिरणी मालकांनीदेखील आता महागड्या किमतीत गहू विकत घेणे सुरू केले.
बफर स्टॉकमधील अतिरिक्त गहू अद्याप खुल्या बाजारात विक्री नाही
ओरिगो कमोडिटीचे वरिष्ठ व्यवस्थापक इंद्रजित पॉल यांनी सांगितले की, सरकारकडे सध्या गाेदामात सुमारे ११५ लाख टन गहू पडून आहे. सरकारने १५ दिवसांच्या आत खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत ( ओएमएसएस) गहू बाजारात विकला नाही, तर पिठाच्या किमतीत ५-६% वाढ होऊ शकते.
एप्रिलच्या भावात दिलासा
पॉल यांनी सांगितले की, मार्च-एप्रिलमध्ये गव्हाचा नवीन साठा बाजारात येईल. त्यानंतरच भावात घट होण्याची शक्यता आहे. मात्र, यादरम्यान सरकारने आपला साठा विकला तर भाव पडू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.