आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 40 People Drown, 11 Dead As Boat Capsizes Today In Chambal River In Rajasthan Etawah Area

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजस्थानमध्ये मोठी दुर्घटना:चंबळ नदीत बोट बुडाल्याने 11 जणांचा मृत्यू; 25 जणांचा भार पेलणाऱ्या बोटमध्ये बसले होते 40 जण

कोटा8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्थानिकांनी बुडणाऱ्या अनेकांना वाचवले, काहीजण नदीच्या प्रवाहात वाहून गेले

कोटा जिल्ह्यातील इटावाजवळ असलेल्या चंबळ नदीत बोट पलटी झाल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले असून, 3 जण बेपत्ता आहेत. अपघात बुधवारी सकाळी 9 वाजता झाला. मृतांमध्ये 6 पुरुष, 4 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. बोट चालवणारा पोहून नदीबाहेर आला. मिळालेल्या माहितीनुसार, बोट फक्त 25 जणांचा भार पेलू शकत होती, पण त्यात 40 जण बसले होते. तसेच, 14 मोटारसायकलही ठेवल्या होत्या. ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या ठिकाणी नदीची खोली 40-50 फूट आहे.

घटनेनंतर स्थानिकांनी बुडणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी नदीत उड्या घेतल्या. पण, नदीचा प्रवास जास्त असल्यामुळे अनेकांना वाचवता आले नाही. पोलिसांनी सांगितले की, हे सर्वजण कमलेश्वर धामला जात होते. मृत्यू झालेले सर्व गोठडा कलाचे रहिवासी होती. अपघात चाणदा आणि गोठडा गावादरम्यान झाला. घटनास्थळी गावातील लोक असल्यामुळे बचाव कार्यात मदत मिळाली.

लोकांनी सांगितले की, लाकडाची बोटची स्थिती आधीपासूनच खराब होती. तरीदेखील क्षमतेपेक्षा जास्त लोकांना त्यात बसवण्यात आले आणि मोटारसायकलही ठेवण्यात आल्या. यामुळे बोट वजन पेलू शकली नाही आणि नदीत बुडाली.

लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. लोकसभा सचिवालयाने जिल्हा प्रशासनोसोबत संपर्क साधला असून कोटा येथून एसडीआरएफची टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. बचावकार्य सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...