आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट 4:लडाखच्या पर्यटनाचे 400 कोटींचे नुकसान, एवढे तर कारगिल युद्धाच्या काळातही झाले नव्हते 

लेह10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येथील बहुतांश हॉटेल 2 खोल्यांच्या गेस्ट हाउसपासून सुरू झाल्या होत्या, आज 400 पेक्षा जास्त हॉटेल आहे, सर्वांचे मालक हे मुळ लडाखचे रहिवासी आहेत, बाहेरच्या लोकांना हॉटेल सुरू करण्याची परवानगी नाही
  • एकाच कुटुंबातील 6 मुलं चालवतात लडाखमधील सर्वात मोठे हॉटेल, मुलगी नसरीनने दिल्लीमधून हॉटेल मॅनेजमेंट केले आहे आणि दोन्ही मुलांनी विदेशात टूरिज्मचे शिक्षण घेतले आहे
  • लडाखमध्ये एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंत टूरिज्म सीजन असते, येथे जीडीपीचा 70-75% भाग यामधूनच येतो

जोरसंगचे वय 52 वर्षे आहे. कारगिल युद्ध झाले तेव्हा ते बटालिक सेक्टरमध्ये बतौर पोर्टर सेनासोबत जोडले गेले. त्यांनी जवळपास एक आठवला वॉलंटियर म्हणून काम केले होते. जोरसंग आता लडाखमध्ये एक गेस्ट हाऊस चालवतात. ते लडाख हॉटेल असोसिएशनचे प्रमुखही आहेत. ते म्हणतात की, "कोरोना आणि चीन सीमेवरील वादामुळे जेवढे नुकसान झाले आहे तेवढे नुकसान कारगिल युद्धाच्या काळातही झाले नव्हते."

पहिले कोरोना आणि आता चीन सीमेवर परिस्थिती बिघडली आहे. यामुळे लडाखच्या पर्यटनाला 400 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. लडाखच्या टूरिज्म सेक्टरमध्ये काम करणाऱ्या असोसिएशनचा हा अंदाज आहे. 

लडाखमध्ये पर्यटन सीजन खूप कमी काळ असतो. एप्रिल ते सप्टेंबर येथे पर्यटकांचा सीजन असतो. तर येथील जीडीपीचा 70-75% भाग हा टूरिज्ममधून येतो. संपूर्ण लडाखची लोकसंख्या 3 लाख आहे आणि या लोकसंख्येचा 80 टक्के भाग पर्यटनावर अवलंबून आहे. प्रत्येक घरातील कमीत कमी 3 लोक पर्यटनासंबंधीत काम करुन आपले पोट भरतात. 

जोरसंग सांगतात की, "कारगिल युद्ध झाले तेव्हा विदेशी पर्यटक जास्त येत होते. युद्ध महिना-दिड महिना सुरू होते. मात्र तेव्हाही फ्लाइट लेह येत जात होती आणि पर्यटकही येत होते. यावेळी मार्चमध्ये लॉकडाउन लागले आणि सीजन सुरू होण्यापूर्वीच संपला. "'

जोरसंग सांगतात की, "कारगिल युद्धापर्यंत लडाख येथे येणारे 80 टक्के पर्यटक हे विदेशी असायचे.  त्यानंतर आपल्या देशातील टूरिस्ट वाढले. सध्या येथे सर्वात जास्तट महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, कोलकाता आणि दक्षिण भारतातील पर्यटक येतात "

मुस्तफा आणि त्यांचे भाऊ गुलाम मोउद्दीन लद्दाख सर्वात मोठे हॉटेल ग्रँड ड्रॅगनचे मालक आहेत. 1976 मध्ये या हॉटेलच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे पिता हाजी दीन मोहम्मद यांनी चार खोल्यांसोबत ही हॉटेल सुरू केली होती. आज त्याच्या हॉटेलमध्ये 70 पेक्षा जास्त खोल्या आहेत. मुस्तफा म्हणतात की, 1974 मध्ये लडाख पर्यटकांसाठी उघडले गेले होते आणि दोन वर्षानंतर त्यांचे वडिलांनी हे गेस्ट हाउस सुरू केले. वडील आता 85 वर्षांचे आहेत आणि आता त्यांचे सहा मुलं मिळून हे हॉटेल चालवतात.

मुस्तफा म्हणतात की, त्यांनीही युद्धात पोर्टर म्हणून जाण्यासाठी आपले नाव दिले होते. तीन दिवसांनंतर त्यांना जायचे होते दरम्यान युद्ध संपले. मुस्तफआच्या हॉटेलमध्ये आमिरपासून शाहरुख, सलमान, कॅटरीना, अनुष्का, जॅक्लिन सर्व येऊन गेलेले आहेत. दरवर्षी 30 हजार गेस्ट त्यांच्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी येतात.  6-7 कोटांचा त्यांचा टर्नओव्हर आहे. मात्र यावेळी सर्व संपले. लॉकडाउन लागल्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त स्टाफ हा घरी परतला.

दोन आठवड्यांपूर्वी, जेव्हा स्थानिक प्रशासनाकडून 3-4 राउंडच्या मीटिंगनंतर डॉक्टरांनी हॉटेल पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली. आता जो स्टाफ हॉटेलमध्ये अडकला होता त्यांच्यासोबतच हॉटेल पुन्हा उघडण्यात आले आहे.

देशातील प्रसिद्ध टूरिस्ट डेस्टिनेशन लडाखमध्ये बाहेरच्या हॉटेल आणि होटेल चेनला येण्याची परवानगी नाही. येथील जास्तीत जास्त हॉटेल एकेकाळी 2 खोल्यांच्या गेस्ट हाउसपासून सुरू झाले होते. आज येथे 400 पेक्षा जास्त हॉटेल, गेस्ट हाउस, होम स्टे आणि कॅम्प आहेत. सर्वांचे मालक स्थानिक लडाखचे रहिवासी आहेत. 

लडाखच्या पर्यटन अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा भाग टॅक्सी चालक आहेत. 4000 टॅक्सी आणि 1000 पेक्षा जास्त बाइक लडाखमध्ये येणाऱ्या पर्यटकांना सुविधा देतात. टॅक्सी असोसिएशनचे सदस्य चोसबल म्हणतात की, त्यांच्याजवळ असे अनेक कुटुंब आले ज्यांचा रोजगार टॅक्सीवर अवलंबून आहे. त्यांना तर आता खाण्या-पिण्याची अडचण निर्माण झाली आहे. सरकार त्यांच्यासाठी काही पॅकेज जाहीर करेल आणि टॅक्सी चालवणाऱ्या 4000 लोकांची व्यवस्था होईल अशी आशा त्यांना आहे.

सेरिंग नामगियाल हे अलटोवा असोसिएशनचे प्रवक्ता आहे.  ते म्हणतात की, "लेहपासून कारगिल 230 किमी दूर आहे. यामुळे कारगिल युद्धाच्या काळात जास्त अडचणी आल्या नाहीत. काही बुकिंग कँसल झाल्या होत्या, मात्र यावेळी 100 टक्के बुकिंग कँसल झाल्या आहेत. 1974 पासून आतापर्यंतचा इतिहास पाहता 2020 मध्ये पर्यटनाला सर्वात जास्त नुकसान झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...