आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 400 Indians Were Stranded On The Afghan Desk Battlefield, 200 Of Them At Kabul Airport

भारताची चिंता...:अफगाण डेस्कने युद्धक्षेत्रात 400 भारतीय अडकले, त्यापैकी 200 जण काबूल विमानतळावर

नवी दिल्ली / मुकेश कौशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अफगाण डेस्कने युद्धक्षेत्रात अडकलेल्या ४०० भारतीयांचा डेटा तयार केला आहे. काबूल विमानतळावर २०० पेक्षा जास्त भारतीयांना पोहोचवण्यात आले आहे. त्यांना गेल्या २-३ दिवसांत तालिबानच्या नाकेबंदीतून वाचवत येथपर्यंत आणण्यात आले. आता त्यांना हवाई दलाच्या विमानाने शनिवारी भारतात आणले जाईल.

सूत्रांनुसार, इतर भारतीयांना आणण्यासाठी आणखी किमान दोन उड्डाणे होतील. भारतीयांव्यतिरिक्त २०० पेक्षा जास्त अफगाणी शिखांनीही भारतात नेण्याची विनंती केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षितपणे परतल्यानंतरच त्यांना आणण्याबाबत निर्णय होईल.

या आहेत अडचणी - विमानतळ अमेरिकी सैन्याच्या नियंत्रणात आहे. नागरी उड्डाणे ठप्प आहेत. त्यामुळे उड्डाणांचा निर्णय अमेरिकेवर अवलंबून आहे. - विमानतळाच्या तांत्रिक भागात कामकाज अत्यंत मर्यादित आहे. तेथे एका देशातील २०० पेक्षा जास्त लोक जमा होऊ शकत नाहीत. - अमेरिकी सैन्याचा स्वत:चा प्राधान्यक्रम आहे. राजनैतिक चर्चा आणि उच्च स्तरावरील समन्वयानेच उड्डाण शक्य होत आहे. - पाकिस्तानची हवाई सीमा भारतासाठी बंद आहे. त्यामुळे इराणमार्गे यावे लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...