आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पवनकुमार
देशात कोरोना विषाणूंचा संसर्ग गंभीर स्वरूप धारण करत आहे. सोमवारी २४ तासांत १३८ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आजवर एकूण ४०७८ लोक मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (सीडीएससीओ) तज्ञ समितीने कोरोनावर औषध असलेले रेमडेसिव्हिर क्लिनिकल ट्रायलशिवाय रुग्णांना देण्याची शिफारस केली आहे. मात्र, औषध तयार करण्याची परवानगी देणाऱ्या सीडीएससीओ संस्थेने यावर अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. संस्थेने कंपनीला काही अटी घातल्या आहेत. त्याचे पालन केल्यानंतरच औषध निर्मिती व विक्रीची परवानगी दिली जाईल. औषध निर्माती कंपनी गिलियाड सायन्सेसने भारतीय कंपन्यांशी करार केला आहे. यानुसार सिप्ला व हिटेरो यांनी हे औषध तयार करण्याची व विक्रीची परवानगी मागितली होती.
प्राप्त माहितीनुसार, औषध देण्यापूर्वी रुग्णाची सहमती अनिवार्य असेल. हे औषध फक्त गंभीर व रुग्णालयातील रुग्णांनाच देण्यात येणार आहे. रुग्णांवर औषधीचा काय परिणाम होतो, याची नोंद ठेवली जाईल. या औषधामुळे रुग्णाची प्रकृती सुधारली की त्याचे दुष्परिणाम झाले आहेत काय, हेही तपासले जाणार आहे. योग्य वाटले तरच जूनअखेरीस औषध बाजारात येऊ शकते. केंद्र सरकार राज्यांना या औषधाचा पुरवठा करणार आहे की राज्यांना हे औषध थेट विकत घेता येईल, हे ठरलेले नाही.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एका रुग्णासाठी रेमडेसिव्हिरची किंमत ७५ हजार ते ३ लाख रुपयांपर्यंत असेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.