आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 403 Accidents In 6 Years Due To Inferior Ammunition Purchased From Ordnance Factory Board ... 24 Soldiers Killed, 131 Injured

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आकलन:ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाकडून खरेदी केलेल्या निकृष्ट दारूगोळ्यामुळे 6 वर्षांत 403 दुर्घटना... 24 सैनिकांचा मृत्यू, 131 जण जखमी

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ओएफबीच्या रसायनांची गुणवत्ता व मिश्रण योग्य नसल्याने खराब झाला 960 कोटींचा दारूगोळा

दरवर्षी भारतीय सैन्याचे सरासरी १११ सैनिक सीमेवर शहीद होतात. पण गेल्या ६ वर्षांत २४ सैनिकांना आपल्याच सैन्याच्या निकृष्ट दारूगोळ्यामुळे प्राण गमवावे लागले, तर १३१ सैनिक जखमी झाले. त्यापैकी काहींना हातपाय गमवावे लागले. हा खुलासा ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाकडून (ओएफबी) खरेदी केलेल्या दारूगोळा व इतर साहित्यावर सैन्याच्या एका अंतर्गत आकलनात झाला आहे. ओएफबी जगातील सर्वात जुन्या सरकारी संरक्षण उत्पादन बोर्डांपैकी एक आहे. संरक्षण मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, ओफबीकडून खरेदी केलेल्या दारूगोळ्याची गुणवत्ता खराब होती.

अंतर्गत आकलन... ओएफबीच्या रसायनांची गुणवत्ता व मिश्रण योग्य नसल्याने खराब झाला ९६० कोटींचा दारूगोळा

सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रत्येक वस्तूप्रमाणे दारूगोळ्याचे शेल्फ लाइफ म्हणजे वय निश्चित असते. ते पूर्ण झाल्यावर तो नष्ट केला जातो. दारूगोळ्यांत वापरलेल्या रसायनांची गुणवत्ता कशी आहे व त्याचे मिश्रण कसे झाले यावर वय अवलंबून असते. ओएफबीमध्ये रसायनांचे मिश्रण आॅटोमेटेड नाही. त्यामुळे ते शेल्फ लाइफ पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळेच दुर्घटना घडतात. अहवालात ज्या साहित्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे त्यात २२ मिमी एअर डिफेन्स शेल्स, आर्टिलरी शेल्स आणि १२५ मिमी टँक शेल्ससह इन्फंट्रीच्या असॉल्ट रायफल्समध्ये वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचाही समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...