आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुड्स अँड सर्विसेज टॅक्स (जीएसटी) काउंसिलच्या 41 वी बैठक गुरुवारी पार पडली. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, कोव्हिडमुळे जीएसटी कलेक्शन कमी झाले. आर्थिक वर्ष 2021 मध्ये जीएसटी कलेक्शन 2.35 लाख कोटींनी कमी होण्याची शक्यता आहे. यादरम्यान सीतारमण यांनी कोरोना महामारीला 'अॅक्ट ऑफ गॉड' म्हटले आहे.
बैठकीत कोणताच मोठा निर्णय घेण्यात आला नाही. अशी आशा व्यक्त केली जात होती की काउंसिल दुचाकी वाहनांच्या करावरील कपातीबाबत निर्णय घेऊ शकते. अर्थमंत्री म्हणाल्या की, दुचाकी वाहनांवरील कर कपातीसंदर्भात कोणतीही टाइमलाइन नाही. आता पुढील बैठकीत यावर विचार होऊ शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जीएसटी परिषदेची पुढील बैठक सप्टेंबरमध्ये होणार आहे.
राज्यांनी एका आठवड्याचा वेळ मागितला
बैठकीत राज्यांना दिल्या जाणाऱ्या कंपनसेशनवर चर्चा झाली. अर्थमंत्री म्हणाल्या की, राज्यांना नुकसान भरपाईसाठी दोन पर्याय देण्यात आले होते. या दोन्ही पर्यायांसाठी राज्यांनी एका आठवड्याचा वेळ मागितला आहे. कंपनसेशनची ही व्यवस्था आर्थिक वर्ष 2021 साठी असेल. अर्थ सचिवांनी यावेळी सांगितले की, आर्थिक वर्ष 2021 मध्ये 65 हजार कोटी रुपयांच्या कंपनसेशन सेस कलेक्शनची आशा आहे.
हे दोन पर्याय राज्यांना दिले
अर्थ सचिव म्हणाले- जीएसटी दर वाढवण्यावर चर्चा नाही
यावेळी अर्थ सचिव म्हणाले की, जीएसटी दरामध्ये वाढ करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. यावेळी सचिवांनी चालू आर्थिक वर्षात 3 लाख कोटी रुपयांच्या कंपनसेशन कलेक्शनची आशा व्यक्त केली आहे. पुढे त्यांनी सांगितले की, एप्रिल ते जुलै या कालावधीत राज्यांच्या जीएसटी भरपाईवर 1.5 लाख कोटी रुपये थकबाकी आहे.
सध्या दुचाकी वाहनांवर 28% जीएसटी
ऑटोमोबाइल सेक्टर मागील अनेक काळापासून दुचाकी वाहनांवर असलेल्या जीएसटीमध्ये कपात करण्याची मागणी करत आहे. सध्या दुचाकी वाहनांवर 28 टक्के जीएसटी लागतो. ऑटोमोबाइल सेक्टरशी संबंधित लोक यात कपात करुन 18 टक्के करण्याची मागणी करत आहेत. बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज यांचे म्हणने आहे की, जर जीएसटी दरात कपात करुन 18 टक्के केल्यास वाहनांची किंमत 10 हजारांपर्यंत कमी होऊ शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.