आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 4.26 Lakh Corona Patients In The Country So Far, 13703 Deaths, India Corona Virus Updates

कोरोना देश:संक्रमितांचा आकडा 4.26 लाखांवर; राजस्थानातील रिकव्हरी रेट सर्वाधिक 77% वर, यानंतर मध्यप्रदेश आणि बिहारचा नंबर

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केजरीवाल सरकारने दिल्लीमध्ये 30 जूनपर्यंत 1 हजार अँबुलन्स तैनात करण्याच्या तयारीत
  • जेपी नड्डा म्हणाले - जूनच्या अखेरपर्यंत पीएम केअर फंडमधून देशात 60 हजार व्हेंटिलेटर उपलब्ध होतील
  • उत्तरप्रदेश, हरियाणा आणि उत्तराखंडने कोरोनामुळे यावर्षी रद्द केली कांवड यात्रा

देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 4 लाख 26 हजार 140 झाला आहे. 1 लाख 74 हजार 803 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून, 2 लाख 37 हजार 252 ठीक झाले आहेत. आतापर्यंत देशभरात 13 हजार 704 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

मागील 24 तासात 15 हजार 140 नवीन रुग्णांची नोंद झाली, यात सर्वाधिक 3,870 रुग्ण महाराष्ट्र आणि त्यानंतर 3,000 रुग्णा दिल्लीतील आहेत. संक्रमितांच्या वाढत्या संख्येमुळे चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. 16 जूनपर्यंत देशात दिड लाख चाचण्या व्हायच्या, आता 2 लाख होत आहेत. 

याच महिन्यात 5.50 लाख संक्रमित होऊ शकतात

मागील दोन दिवसांपासून दररोद पंधरा हजार संक्रमित वाढत आहेत. अशीच संख्या राहिल्यास पुढील पाच दिवसात देशातील कोरोना रुग्णांची संख्या 5 लाख आणि या महिन्याच्या अखेरपर्यंत 5.50 लाख होऊ शकते.

दरम्यान, दिल्ली सरकारने राजधानीमध्ये 30 जूनपर्यंत 1 हजार अँबुलन्स तैनात करण्याची तयारी केली आहे. राज्य सरकार प्रयत्न करत आहे की, प्रत्येक खासगी रुग्णालयात 60 टक्के बेड रिजर्व्ह असावेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गृह मंत्री अमित शाहांसोबतच्या बैठकीत याविषयावर चर्चा केली. या बैठकीत उपराज्यपाल अनिल बैजलही उपस्थित होते. 

याच काळात, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, पीएम केअर फंडच्या माध्यमातून देशात जूनच्या अखेपर्यंत 60 हजार व्हेंटिलेटर उपलब्ध होतील. नड्डा यांनी भाजपच्या व्हर्चुअल रॅलीमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना ही माहिती दिली. 

बातम्या आणखी आहेत...