आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त ‘दिव्य मराठी’च्या विशेष सर्वेक्षणात लोकांनी व्यक्त केलेल्या मतांमुळे, भारतीय कुटुंब व्यवस्था आजही मजबूत आहे आणि कठीण प्रसंगी लोक पहिली मदत कुटुंबाकडेच मागतात, हे सिद्ध झाले आहे.
कुटुंब नेहमी, कुठल्याही स्थितीत मदतीसाठी तयार असते, असे लोकांचे म्हणणे आहे. या सर्व्हेत १७,९४७ लोकांनी आपले अमूल्य मत नोंदवले आहे. त्यात भारतीय कुटुंबाच्या मजबुतीची कारणे स्पष्टपणे समोर आली आहेत. पहिले, ४३.३ टक्के लोक मानतात की रोजचे काम आणि व्यग्रतेतून आम्ही रोज कुटुंबासोबत व्यतीत करण्यासाठी तीन तासांचा वेळ काढतो.
दुसरे, कोविडसारख्या कठीण काळात ७७ टक्के लोकांना कुटुंबाने भावनात्मकरीत्या सांभाळण्यास मदत केली. पण कुटुंबांत अंतरही वाढत आहे याबाबत लोकांनी चिंताही व्यक्त केली आणि त्याची दोन प्रमुख कारणे आहेत : ४४ टक्के लोकांनी म्हटले की, मोबाइलवर जास्त वेळ घालवणे हे त्याचे प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर नात्यांत मान-सन्मानही घटला आहे.
दिव्य मराठीच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष
5. कोविडसारख्या कठीण काळात कुटुंबाने तुम्हाला कशी मदत केली?
76.9% लोकांनी मान्य केले की, कुटुंबाने कोविडच्या कठीण काळात आम्हाला भावनात्मकरीत्या मदत केली. 1.7% म्हणाले भावनात्मक आणि आर्थिक दोन्ही पद्धतीने मदत केली. जवळपास ५२% लोक मानतात की, कुटुंब कुठल्याही स्थितीत आमची सर्वात मजबूत सपोर्ट सिस्टिम आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.