आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 44 Layer Foundation Being Built For The Construction Of Lord Rama's Grand Temple In Ayodhya, General Secretary Of The Trust Said – Work Will Be Completed By August

राम मंदिराच्या कामाला वेग:मंदिरासाठी रचला जातोय 44 थरांचा पाया, अयोध्येतून समोर आले मंदिर बांधकामाचे फोटो

अयोध्या19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राम मंदिर ट्रस्टचे महासचिव म्हणाले- ऑगस्टपर्यंत पायाचे काम पूर्ण होईल

अयोध्येत तयार होत असलेल्या भगवान श्री रामाच्या भव्य मंदिराचे काम वेगाने सुरू आहे. सध्या मंदिराचा पाया रचण्याचे काम सुरू असून, तब्बल 44 स्थरांचा पाया मंदिरासाटी बांधला जात आहे. आतापर्यंत 6 स्थरांचे काम पूर्ण झाले आहे. तौक्ते आणि यास वादळादरम्यान झालेल्या पावसामुळे काही दिवस काम बंद होते. सोमवारपासून हे काम पुन्हा सुरू झाले. या कामाचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये मंदिराचे काम वेगाने सुरू असल्याचे दिसत आहे. दरम्यान, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय सोमवारी कामकाज पाहण्यासाठी मंदिर परिसरात आले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, मंदिराच्या पायाचे काम येत्या ऑगस्टपर्यंत पूर्ण केले जाईल.

1.20 लाख चौरस फुटांमध्ये बांधला जातोय पाया

चंपत राय यांनी यावेळी सांगितले की, 400 फूट लांबी आणि 300 फूट रुंदी(1.20 लाख चौरस फुट) मध्ये या पायाचे काम सुरू आहे. यात 44 स्थर बनवले जातील आणि प्रत्येक स्थराची जाडी 12 इंच असेल. रोलर चालवल्यानंतर हे दबून 10 इंच होईल.

ही जमीन समुद्र सपाटीपासून 93 मीटर वर

चंपत राय पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी समुद्र सपाटीपासून 105 मीटर उंच भूमीवर पुजा केली होती. आता त्या ठिकाणावरुन ढिगारा हटवण्यात आला आहे. त्यामुळे मंदिराची उंची समुद्र सपाटीपासून 93 मीटर वर असेल.

पायातून निघालेल्या मातीला प्रसाद समजून घेऊन जात आहेत भावीक

अयोध्येत राम मंदिराच्या खोदकामातून निघालेल्या मातीला घरोघरी पोहचवण्याचे काम सुरू करण्यात आले होते. तसेच, दररोज रामाचे दर्शन करण्यासाठी येणारे भाविक येथील माती आपल्यासोबत घरी घेऊन जात होते. पण, कोरोनामुळे मागील काही दिवसांपासून हे बंद आहे.

बातम्या आणखी आहेत...