आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लद्दाखमध्ये शुक्रवारी रात्री 8.15 वाजता भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपाचे केंद्र कारगिलपासून 200 किलोमीटर दूर उत्तर-पश्चिममध्ये होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.5 मोजण्यात आली आहे. मेघालयमध्येही 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला. याचे केंद्र तुरापासून 79 किलोमीटर पश्चिममध्ये होते.
काही दिवसांपूर्वी असम आणि गुजरातमध्ये आला भूकंप
मिजोरममध्ये 24 जूनला सकाळी 8. 2 वाजता भूकंप आला होता. याची तीव्रता 4.1 मोजण्यात आली होती. येथे सलग चौथ्या दिवशी भूकंप आला आहे. यापूर्वी आयजोलमध्ये 3.7 तीव्रतेचा भूकंप आला होता. तसेच, गुजरातमध्येही 14 जूनला रात्री 8.13 वाजता 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला. याचे केंद्र कच्छच्या वोंध गावात होते. कच्छमथ्ये 10 सेकंदापर्यंत भूकंप जाणवला. राजकोटमध्ये तीन आफ्टर शॉक जाणवले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.