आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लेकरांची आई:पुण्याच्या 45 वर्षीय प्रीती म्हस्केंनी सायकलने 14 दिवसांत 4000 किमी अंतर कापले

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, वय हा फक्त एक आकडा आहे. हे पुण्यातील 45 वर्षीय प्रीती म्हस्के यांनी सिद्ध केले आहे. त्यांनी सायकलने गुजरात ते अरुणाचल प्रदेश असे सुमारे 4000 किमी अंतर त्यांनी 14 दिवसांत पुर्ण केले आहे.

मोहिमेचे नेते घनश्याम रघुवंशी यांनी सोमवारी सांगितले की, प्रीती 1 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवरील कोटेश्वर मंदिरापासून आपला प्रवास सुरू केला होता. सायकलने प्रवास करत त्या गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाममधून अरुणाचल प्रदेशात पोहचल्या.

14 दिवसात प्रवास पूर्ण
त्यांनी सांगितले की, म्हस्के यांनी 13 दिवस, 19 तास आणि 12 मिनिटांत 3995 किमीचा प्रवास पूर्ण केला आणि 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्री अरुणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेजवळील किबिथू येथे पोहोचल्या. या पराक्रमामुळे अवघ्या 14 दिवसांत देशभरात पश्चिमेकडून पूर्वेकडे सायकल चालवणारी त्या पहिल्या 'महिला सोलो सायकलिस्ट' बनल्या आहेत. .

5 वर्षांपूर्वी सायकल चालवायला सुरुवात
आजारपणा आणि नैराश्याचा सामना करण्यासाठी प्रीती यांनी पाच वर्षांपूर्वी सायकलिंगचा मार्ग स्वीकारला होता. वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशन आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे कागदपत्रे, पुरावे, टाइम स्टॅम्पची छायाचित्रे ही स्वीकारली गेली आहेत. योग्य वेळी ते प्रमाणपत्र देतील, असे रघुवंशी यांनी सांगितले. अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागात डिजिटल नेटवर्कच्या खराब समस्यांमुळे मीडियाला माहिती देण्यास विलंब झाल्याचे ते म्हणाले.

दोन मुलांच्या आई आहेत पुण्याच्या प्रीती मस्के
दोन मुलांच्या आई आहेत पुण्याच्या प्रीती मस्के

वाटेत अनेक आव्हानांचा सामना
प्रीती यांना या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. 5 जणांनी त्यांचा पाठलाग केला होता. विशेषत: आसाम आणि अरुणाचल प्रदेशात, एकूण 15,679 मीटर उंचीवर त्यांनी अनेक आव्हाने पेलली. बिहारमधील दरभंगा येथून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे धोकादायक भागात सायकल चालवणे कठीण झाले होते. अरुणाचल प्रदेशातील तेजूनंतर हा मार्ग खराब रस्ते, खड्डे आणि बांधकाम कामामुळे कठिणा आहे.

प्रीती म्हणाल्या की, अरुणाचल प्रदेशात संध्याकाळी आणि रात्री तापमान 2-3 अंश सेल्सिअसने घसरले. त्यामुळे प्रवास करणे कठीण झाले. पुरेसे उबदार कपडेही नव्हते. शून्य नेटवर्क आणि निर्जन रस्त्यांमुळे मी दिशा चुकले आणि रात्री खूप लांब चालावे लागले.

नैराश्‍य, मानसिक ताणावर मात करण्यासाठी प्रीती यांनी 5 वर्षांपूर्वी सायकलिंग सुरू केले.
नैराश्‍य, मानसिक ताणावर मात करण्यासाठी प्रीती यांनी 5 वर्षांपूर्वी सायकलिंग सुरू केले.

10 दिवसात 350 किमी सायकल चालवली
सीमा रस्ते संघटनाने आवश्यक लॉजिस्टिक आणि नेव्हिगेशनल सहाय्य पुरवले. ज्यामुळे ऑपरेशन पूर्ण करण्यात मदत झाली. प्रीती यांनी पहिल्या 10 दिवसात सुमारे 350 किमी सायकल चालवली आणि सॅडल सायकलिंगची सरासरी वेळ 19 तास होती.

कॉफीने मदत झाली
पुढे त्या म्हणाल्या की, सतत नॉन-स्टॉप राइड दरम्यान झोपेची कमतरता भरून काढणे हे एक आव्हान होते. मी सतत 19 तास सायकल चालवत होते. कधी कधी 24 तासांपेक्षा जास्त सायकल चालवली. यावेळी कॉफीनेच मला जागे ठेवले होते. आसाम-अरुणाचल सीमेजवळ प्रीती यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

अवयवदानाची मोहीम
रघुवंशी यांनी सांगितले की, उर्वरित प्रवास मागे घ्यावा लागेल, असे दिसून येत आहे. पण, मसाज, स्ट्रेचिंग व्यायाम आणि विश्रांतीमुळे ती बरी झाली आहे. अवयवदानासाठी पाठिंबा आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी RebirthThrust.org या संस्थेसाठी मोहीम चालवली.

बातम्या आणखी आहेत...