आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसमधील वादंगावर टीका:'हे' ऐकण्यासाठीच 45 वर्षे काँग्रेसची गुलामी केली का? गुलाम नबी आझाद यांना असदुद्दीन ओवेसींचा सवाल

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसमध्ये सध्या घमासान सुरू असल्याचं चित्र आहे. काँग्रेसच्या कार्यकारी समितीची महत्त्वाची बैठक नवी दिल्लीमध्ये झाली. या बैठकीत मोठा गदारोळ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये राहुल गांधींनी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांवर भाजपशी 'मिलीभगत' असल्याचे आरोप केले होते. यावर काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. यावरुन आता राजकारणं चागलंच रंगलं आहे.

काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पत्र पाठवत पक्ष नेतृत्त्वात बदल करण्याची मागणी केली होती. यानंतर राहुल गांधींनी हे पत्र म्हणजे काँग्रेस नेत्यांची भाजपसोबत 'मिलीभगत' असल्याचं वृत्त समोर आलं राहुल गांधींनी केलेल्या आरोपावर गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला. या संपूर्ण प्रकरणावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी गुलाम नबी आझाद यांना 'याचसाठी 45 वर्षे काँग्रेसची गुलामी केली का?' असा ओवेसींनी केला आहे. तसेच त्यांच्यावर करण्यात आलेल्या जुन्या आरोपांची आठवणही त्यांनी गुलाम नबी आझादांना करुन दिली आहे.

काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी 'काव्यात्मक न्याय! गुलाम नबी आझाद तुम्ही माझ्यावर असेच आरोप केले होते. आता तुमच्यावरही तसच आरोप झाला आहे. या साठीच 45 वर्षे काँग्रेसची गुलामी केली का? आता हे सिद्ध झालं आहे की, जो कुणी जानवेधारी नेतृत्वाला विरोध करतो त्यांना बी टीम ठरवलं जातं. आता मला आशा आहे की, मुस्लिमांना काँग्रेसविषयी असलेल्या निष्ठेची किंमत कळेल?' असे म्हणत त्यांनी गुलाम नबी आझाद यांना सुनावलं आहे.