आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 47% Workers Affected, Lockdown Brought To Zero, Package Of Rs 11 Lakh Crore Given For 30 Deaths; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर नियंत्रण कसे मिळवायचे:47% कामगार बाधित आढळल्याने लॉकडाऊन करत प्रमाण शून्यावर आणले, 30 मृत्यू असतानाच 11 लाख कोटींचे पॅकेज दिले

सिंगापूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिंगापूरमध्ये कोरोना संसर्ग नियंत्रणात, अर्थव्यवस्था होतेय सुरळीत, तरीही कोरोना प्रोटोकॉलचे सक्तीचे पालन

सिंगापूर आधीप्रमाणेच मोकळ्या हवेत श्वास घेत आहे. काही मर्यादित निर्बंधांसह येथील लोक हवे तेथे फिरू शकतात. मात्र, मास्क व फिजिकल डिस्टन्सिंग पूर्णपणे सक्तीचे आहे. सध्या एका गटात ८ पेक्षा जास्त लोकांना फिरता येत नाही. मुले शाळेत जात आहेत. एक वर्षाच्या वर्क फ्रॉम होमनंतर बहुतांश कर्मचारी कार्यालयात येत आहेत. आता मे महिन्यात मजबूत अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण होण्याची सिंगापूरच्या लोकांना आशा आहे. या वर्षी अर्थव्यवस्थेत ४ ते ६% दराने वाढीचा सरकारचा अंदाज आहे. गेल्या वर्षी अर्थव्यवस्था ५.८% पर्यंत उतरत वाईट स्थितीत गेली होती. मजबूत अर्थव्यवस्थेचे संकेत सिंगापूरच्या कोविड संसर्गावरील विजयाची कहाणी सांगत आहेत.

अमेरिका, भारत, ब्राझील आणि युरोप, दक्षिण अमेरिका आणि आशियातील अनेक देशांच्या तुलनेत कोरोनाविरोधातील सिंगापूरची लढाई खूप यशस्वी ठरली आहे. मात्र, येथील उपाय इतर कोणत्याही देशात सहजपणे लागू करता येणार नाहीत. सरकारचा जेवढा प्रभाव सिंगापूरमध्ये दिसला त्याची भारतासारख्या देशात कल्पनाही करता येणार नाही. सरकार अजूनही सजग व तत्पर आहे. बाहेरून आलेल्या लोकांपैकी ४० बाधित आढळले. त्यांच्यात विषाणूचे वेगळे म्युटेशन आढळले आहे. जगात १५ कोटी लोक बाधित झाले आहेत. मात्र सिंगापूरचे लोक स्वत:ला सुरक्षित समजत आहेत. तिकडे देशातील १५% लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

सुरुवातीला घबराट निर्माण झाल्याने अन्नपदार्थ बाजारातून गायब, अनेक देशांशी करार करत उत्पादनांची आगाऊ खरेदी
संसर्ग वाढल्याने लोक घाबरले. डबाबंद अन्न, तांदूळ, पास्तासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. काही वेळेतच सर्व विकले गेले. या खरेदीतून खऱ्या संकटाचा इशारा मिळाला. सिंगापूर ९०% अन्न आयात करतो. कोरोना संकटामुळे जागतिक पुरवठा साखळी बाधित झाली. फेअर प्राइस ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिए पेंग सांगतात, या स्थितीचा सामना करण्यासाठी त्यांनी स्थानिक फर्म आणि मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलियातील फर्मसोबत करार केले. निश्चित वेळेआधीच अन्न उत्पादने खरेदी केली.

९०% संसर्ग कामगारांमध्ये आढळल्याने त्यांना घरातच देखरेखीत ठेवले आणि संसर्ग कमी होत शून्यावर आला
१२ मार्चला डब्ल्यूएचओने कोरोनाला महामारी जाहीर केले तेव्हा ११४ देशांत १.२ लाख बाधित होते. ४३०० मृत्यू झाले होते. त्या वेळी सिंगापूरमध्ये १७८ रुग्ण होते. एप्रिलपासून स्थिती बिघडल्याने सरकारने कोणताही आडपडदा न ठेवता लोकांना सांगितले की, ३ लाख २० हजार स्थलांतरित मजूर, जे मुख्यत्वे बांधकाम क्षेत्रात काम करतात, त्यातील ४७% बाधित आढळले आहेत. ९०% संसर्ग स्थलांतरित कामगारांमध्ये आढळला आहे. सरकारने कठोर लॉकडाऊनचे आदेश काढले. स्थलांतरित मजुरांना घरातच ठेवून त्यांची देखरेख केली. यामुळे संसर्ग कमी होऊन शून्यावर आला.

काही जण सेफ डिस्टन्सिंग अॅम्बेसेडर झाले, ते त्यांच्या भागात फिजिकल डिस्टन्सिंगवर देखरेख ठेवतात

  • प्रत्येक कार्यालय, शॉपिंग मॉल, शिक्षण संस्था, जिम, रेस्तराँ व बारमध्ये सेफ एंट्री नावाची डिजिटल चेक-इन व्यवस्था लागू करण्यात आली.
  • टॅक्सींमध्येही क्यूआर कोड स्कॅन करण्याची व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
  • लोकांमधूनच काही जण सेफ डिस्टन्सिंग अॅम्बेसेडर झाले. ते फिजिकल डिस्टन्सिंगवर देखरेख करतात.
  • सरकारने ५.४% दराने विकास दर घटत असतानाही ११ लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले, तेव्हा देशात कोरोनाने फक्त ३० मृत्यू झाले होते.
  • सरकारची भूमिका, नि:पक्ष व सततच्या माहितीमुळे लोकांचे मनाेधैर्य वाढवले आणि त्यांनीही स्वप्रेरणेने कोरोनाशी लढण्यासाठी योगदान दिले आणि सरकारची मदत केली.

सार्सच्या वेळची तयारी आली कामी, काॅन्टॅक्ट ट्रेसर्स लावले
सरकारने गेल्या वर्षी २३ जानेवारीला पहिला रुग्ण सापडल्यानंतर आतापर्यंत संसर्ग रोखण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने काम केले आहे. पहिला रुग्ण आढळताच चीनमधून येणाऱ्यांना बंदी घातली व सीमा केल्या. ८ फेब्रुवारीला पंतप्रधान ली सिएन यांनी सांगितले की, जसा आम्ही सार्स विषाणू संपवला तसाच यालाही संपवू. मल्टी मिनिस्ट्री टास्क फोर्स स्थापन केले. त्याची धुरा आरोग्यमंत्री गॅन किम यांग (नुकतेच व्यापारमंत्री बनवण्यात आले) व राष्ट्रीय विकास मंत्री लॉरेन्स वाँग यांनी सांभाळली. त्यांनी धोरण तयार केले. कॉन्टॅक्ट ट्रेसर्स तयार केले व आरोग्य कर्मचारी कामाला लागले.
सिंगापूरच्या १५% लोकांना दोन्ही डोस दिले, रोज ४० पेक्षा कमी रुग्ण, यात बहुतांश बाहेरचे

बातम्या आणखी आहेत...