आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जम्मू-कश्मीरमध्ये हायस्पीड इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली आहे. 18 महिन्यानंतर राज्यात 4 जी इंटरनेट सर्व्हिस पुन्हा सुरू करण्यात आली. जम्मू-कश्मीरच्या पावर अँड अन्फॉर्मेशनचे प्रधान सचिव रोहित कंसल यांनी या विषयीची शुक्रवारी माहिती दिली.
हायस्पीड इंटरनेट सेवा बहाल झाल्यानंतर जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, '4G मुबारक! ऑगस्ट 2019 नंतर पहिल्यांदा संपूर्ण J&K मध्ये 4G मोबाइल डेटा सर्व्हिस बहाल करण्यात आली. देर आऐ दुरुस्त आये.'
उधमपूर आणि गांदरबल वगळता इतर जिल्ह्यांमध्ये होती 2 जी सेवा
जम्मू-कश्मीरमध्ये ऑगस्ट 2019 मध्ये विशेष राज्याचा दर्जा परत घेण्यापूर्वीपासूनच हायस्पीड इंटरनेट सर्व्हिस बंद करण्यात आली होती. 5 ऑगस्ट 2019 ला राज्याला यूनियन टेरेटरीचा दर्जा देण्यात आला होता. राज्यामध्ये 2 जी इंटरनेट सर्व्हिस 25 जानेवारी 2020 ला बहाल करण्यात आली होती. 16 ऑगस्ट 2020 ला उधमपूर आणि गांदरबलमध्ये हाय स्पीड इंटरनेट सेवा ट्रायल बेसवर सुरू करण्यात आली होती. इतर जिल्ह्यांमध्ये 2 जी इंटरनेट सेवा जारी करण्यात आली होती.
देशद्रोही घटक सक्रिय होतील अशी सरकारला शंका होती
सुरक्षआ एजेंसी मान होत्या की, देशद्रोही तत्त्व आर्टिकल 370 हटवल्यानंतर दुष्प्रचार करतील आणि इंटरनेटमुळे त्यांना मदत होईल. यामुळे 4G मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्या दरम्यान राज्याचे अनेक राजकीय दल आणि फुटीरतावादी नेत्यांनाही नजरबंद करण्यात आले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.