आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • 4G Rates May Rise By 30% Before 5G Comes, Countdown To 5G Services In Country Begins

दिव्‍य मराठी विश्‍लेषण:5 जी येण्यापूर्वी 30 % पर्यंत वाढू शकतात 4 जीचे दर, देशामध्ये 5 जी सेवांचे काउंटडाऊन सुरू

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात ५जी टेलिकॉम सेवा सुरू होण्यापूर्वी ४जीच्या दरांत वाढ केली जाऊ शकते. २०२२ मध्ये कंपन्या ३० टक्क्यांपर्यंत दर वाढवणार असल्याचा अंदाज क्रिसिल रेटिंग्ज, नोमुरा आणि गोल्डमन सॅक्स यांनी वर्तवला आहे. यानंतर कंपन्या ५जीसाठी प्रीमियम दर आकारतील.

सोमवारी संपलेल्या ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावात १.५ लाख कोटींची बोली लावण्यात आली. ५जी स्पेक्ट्रममध्ये मोठी गुंतवणूक पाहता कंपन्या ५जी सेवांसाठी वेगवेगळे दर आकारतील, असा क्रिसिल रेटिंग्जचा अंदाज आहे. क्रिसिलच्या मते, ५जी सेवांचा वापर ४जी दरांवरील प्रीमियमवर अवलंबून असेल. त्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात ५जीचा अवलंब करावा, हे पक्के करण्यासाठी कंपन्या ४जी सेवांचे दर वाढवू शकतात. नोमुरा ग्लोबल मार्केट रिसर्चचा अंदाज आहे की, कंपन्या दिवसाला १.५ जीबी ४जी प्लॅन्सच्या दरांवर ३० टक्क्यांपर्यंत प्रीमियम वसूल करू शकतात. नोमुराने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, सुरुवातीच्या काळात ग्राहक (ज्यांच्याकडे १५,००० रुपयांपेक्षा अधिक किमतीचे स्मार्टफोन आहेत) ५जी सेवा सबस्क्राइब करतील. अशा वेळी टेलिकॉम कंपन्या ५जीवर प्रीमियम दर आकारतील, असा आमचा अंदाज आहे. तिकडे गोल्डमन सॅक्सने सांगितले की, २०२२ अखेरपर्यंत टेलीकॉम कंपन्या पुन्हा दर वाढवतील, असा आधीपासून अंदाज राहिला.

रिलायन्स जिअो ५जीसाठी सर्वात मजबूत स्थितीत
सर्व २२ टेलिकाॅम सर्कलमध्ये प्रीमियम ७०० मेगाहर्ट‌्झ बँडमध्ये ५जी स्पेक्ट्रम खरेदी करणारा जिअो एकमेव ऑपरेटर आहे. यानुसार जिअोने ५जीच्या शर्यतीत प्राथमिक आघाडी घेतली आहे. टेलिकॉमतज्ज्ञांच्या मते, लो फ्रिक्वेन्सी बँड असल्याने याचे सिग्नल इमारतींच्या आत पोहोचू शकतात. त्यामुळे ही सेवा इनडोअर कव्हरेजसाठी उपयुक्त आहे. याचे आऊटडोअर कव्हरेजही चांगले आहे. ७०० मेगाहर्ट््झ बँडचे टॉवर सुमारे १० किमीपर्यंत कव्हरेज देऊ शकते.

भास्कर एक्स्पर्ट -महेश उप्पल
-कंपन्यांना ५जी स्पेक्ट्रम मिळण्यास किती वेळ लागेल?
याची प्रक्रिया पुढील १०-१५ दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

-देशात ५जी सेवांची सुरुवात कधीपर्यंत शक्य आहे?
ऑक्टोबर-नोव्हेंबर किंवा वर्षाच्या अखेरीस कॉर्पोरेट व व्यावसायिक आदी निवडक ग्राहकांसाठी ५जी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सामान्यांपर्यंत या सेवा पोहोचण्यासाठी २-३ वर्षे लागू शकतात.

-दीर्घकाळ लागण्याचे खास कारण?
५जीच्या पायाभूत सुविधांसाठी कंपन्यांना मोठी गुंतवणूक करावी लागेल आणि यासाठी वेळही द्यावा लागेल. याशिवाय मागणीनुसार कंपन्या ५जीची व्यापकता वाढवतील.

-५जीसाठी कंपन्यांचा ७०० मेगाहर्ट््झच्या स्पेक्ट्रमवर भर का?
कारण या स्पेक्ट्रमची रेंज हाय-फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रमपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. यामुळे कंपन्यांना टॉवर कमी लावावे लागतात.

-५जी सेवा ४जीच्या तुलनेत महाग असतील?
होय. ५ जी सेवांसाठी कंपन्या सुरुवातीला अधिक प्रीमियम दर आकारतील. मात्र, जसजशी याची पोहोच वाढेल, तशा किमती कमी होण्याची शक्यता राहील.

बातम्या आणखी आहेत...