आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशातील जवळपास ५ कोटीपेक्षा जास्त भारतीयांकडे हात धुण्यासाठी खास सुविधा नाहीत. यामुळे त्यांना कोरोना संसर्ग झाल्यास अथवा त्यांच्याकडून दुसऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका खूप जास्त आहे. हा निष्कर्ष अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फाॅर हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशनच्या (आयएचएमई) संशोधनात काढण्यात आला आहे. संशोधकांनी म्हटले, अल्प व मध्यम उत्पन्न गटातील देशांत दोन अब्जपेक्षाही जास्त लोकांकडे साबण, स्वच्छ पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे श्रीमंत देशांतील लोकांच्या तुलनेत संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त आहे. ही संख्या जगातील लोकसंख्येच्या एक चतुर्थांश आहे. सर्वात बिकट परिस्थिती आफ्रिका उपखंड व ओशिनयाची आहे. येथे निम्म्याहून अधिक लोकसंख्येत सॅनिटायझेशनची सुविधा नाही. ४६ देशात निम्म्या लोकांकडे हात धुण्यासाठी साबण व पाणी नाही.
स्वच्छतेचा अभाव; ७ लाख लाेकांचा जातो जीव
आईएचएमईचे प्राध्यापक मायकल ब्राऊयेअर यांनी सांगितले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हात धुणे हाच एकमेव उपाय आहे. अनेक देशात हात धुण्यासाठी सुविधाही ही बाब गंभीर आहे. आरोग्य सुविधाही मर्यादित आहेत. हात धुण्याची सोय नसल्याने वर्षाला ७ लाखांहून अधिक व्यक्ती मृत्युमुखी पडतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.