आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळ्यानंतर भीतीचे वातावरण आहे. तेथून आलेल्या काही विमानात आतापर्यंत 11 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील एक विमान काल रात्री दिल्लीत पोहोचले. यातील 266 प्रवाशांपैकी 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर दोन पॉझिटिव्ह प्रवासी कोलकातात सापडले. ते रविवारी लंडनहून कोलकातात आले होते.
दरम्यान अहमदाबादेत आलेल्या एका विमानात 4 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह सापडले. यामध्ये एका ब्रिटिश नागरिकाचा समावेश आहे. दिल्लीत सापडलेल्या संक्रमित प्रवाशांचे नमुने संशोधनासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) ला पाठवले आहे. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
मुंबईतही प्रवाशांना आयसोलेट केले
यादरम्यान मुंबईतही लंडनहून आलेल्या दोन विमानातील प्रवाशांना विमानतळावरून थेट हॉटेलमध्ये नेण्यात आले. येथे त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल. दरम्यान काही प्रवाशांनी यावर नाराजी दर्शवली आहे. याबाबत आम्हाला याबाबत कोणीच काही माहिती दिली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ब्रिटनमध्ये अलिकडेच कोरोनाचा नवीन स्ट्रेन (बदलेले रूप) आढळले आहे. हा पहिल्यापेक्षा 70% अधिक संक्रामिक असल्याचे म्हटले जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.