आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंजाबच्या तरण तारणमध्ये बीएसएफने बॉर्डरवर 5 घुसखोरांना ठार केले आहे. संशयित हालचाली दिसल्यावर बीएसएफने घुसखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी फायरिंग करण्यास सुरुवात केली. जबाबी कारवाईमध्ये पाच घुसखोरांना कंठस्नान घालण्यात आले आहे. ते दहशतवादी किंवा ड्रग तस्कर असल्याचा संशय आहे. सकाळी पावणे पाच वाजताची ही घटना आहे. संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
पाच घुसखोरांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. घटनास्थळावरून एक रायफल आणि बॅगही सापडली आहे. ही चकमकी तारण तारण जिल्ह्यातील ढल पोस्टजवळ घडली. गुप्तचरांच्या आधारे शुक्रवारी बीएसएफच्या 103 बटालियनने शोधमोहीम सुरू केली. बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की जवान नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. यावेळी, त्यांना ढलच्या सरहडी गावाजवळ पाकिस्तानच्या बाजूने काही संशयास्पद लोक भारतीय सीमेवर जाताना दिसले. त्यानंतर सैनिक सतर्क झाले होते.
पाकिस्तानात पंजाबमधून केली जात होती ड्रग तस्करी
बीएसएफचे गुरदासपूर सेक्टरमध्ये बीओपी चंदू वडालाजवळ 89 बटालियनचे जवान आणि एसटीएफ (स्पेशल टास्क फोर्स)ने काही दिवसांपूर्वी 5 किलो हेरोइन जप्त केली होती. पाकिस्तानी तस्करांककडून हेरोइन मागवणारा एक युवक सुखविंदर सिंह काका यालाही अटक करण्यात आली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.