आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 5 ISI Suspects Arrested In Delhi, 2 From Punjab And 3 From Kashmir; Detained After The Encounter

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीतील दहशतवादाचा कट उधळला:ISI शी संबंधित 5 संशयितांना अटक, यातील 2 पंजाब आणि 3 काश्मीरचे; चकमकीनंतर घेतले ताब्यात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो एन्काऊंटरस्थळाचा आहे. पोलिस आणि संशयितांमध्ये 6 राउंड गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. - Divya Marathi
फोटो एन्काऊंटरस्थळाचा आहे. पोलिस आणि संशयितांमध्ये 6 राउंड गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्ली पोलिसांनी 5 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. शकरपूर भागात ही कारवाई करण्यात आली. याआधी चकमकही झाली होती. पोलिसांच्या मते ते कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, ते ISIच्या नार्को टेररिझम नेटवर्कशी जोडलेले आहेत. अटक केलेल्यापैकी 2 पंजाबचे आणि 3 काश्मीरचे आहेत. शब्बीर अहम, अय्यूब पठाण, रियाज राठर, गुरजीत सिंह आणि सुखदीप सिंह अशी त्यांची नावे आहेत. त्यातील एक पंजाबचे शौर्य चक्र विजेता कार्यकर्ता बलविंदर यांच्या हत्ये मध्येही सहभागी होता.

जम्मू-काश्मीरचा क्रमांक असलेल्या पांढऱ्या कारमध्ये सवार असलेल्या संशयितांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गोळीबार सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. हे संशयित JK 04B 8173 या कारमध्ये होते. संशयितांपैकी एकाचा पंजाबमधील शौर्य चक्र विजेता कार्यकर्ता बलविंदर सिंग यांच्या हत्येमध्ये हात असल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दहशतवाद्यांनी 17 ऑक्टोबर रोजी बलविंदर यांची हत्या केली होती. बलविंदर सिंह यांनी पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांच्या काळात शौर्याने दहशतवाद्यांचा सामना केला होता. त्यांच्यावर 42 वेळा हल्ले झाले होते. यामुळे त्यांना कुटुंबासह शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser