आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 5 Laborers Killed, 11 Injured As Truck Overturns In Narsinghpur In Madhya Pradesh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्य प्रदेश:नरसिंगपूरजवळ ट्रक अपघातामध्ये 5 मजुरांचा मृत्यू, आंब्याने भरलेल्या ट्रकमध्ये लपून घराकडे निघाले होते मजूर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रकमध्ये एकूण 15 मजूर प्रवास करत होते

मध्य प्रदेशातील नरसिंगपूरच्या पाठा गावाजवळ ट्रक अपघातामध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला असून 11 लोक जखमी झाले आहेत. यामधील दोघांची प्रकृती नाजूक सांगण्यात येत आहे. ट्रकमध्ये दोन ड्रायव्हर आणि एक कंडक्टरसहित एकूण 18 लोक होते. यामधील 15 जण हैदराबादमध्ये मजुरी करत होते. सर्व मजूर आंब्याच्या ट्रकमध्ये बसून आग्र्याकडे चालले होते.

हा अपघात नॅशनल हायवे 44 वर नरसिंहपूर आणि सिवनी दरम्यान झाला. ट्रक पालटल्याने 15 मजूर ट्रकखाली दबले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हाधिकारी आणि एसपी पोहोचले. नरसिंगपूरचे जिल्हाधिकारी दीपक सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व मजूर ट्रकमध्ये लपून घरी निघाले होते. 

एक मजूर तीन दिवसांपासून आजारी, सर्वांची कोरोना टेस्ट होणार

सिव्हिल सर्जन अनिता अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर जखमी असलेल्या दोन जणांना जबलपूर येथे हलवण्यात आले आहे. यामधील एकाच्या मेंदूला गंभीर जखम झाली असून दुसऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. इतर मजुरांची प्रकृती स्थिर आहे. या मजुरांमधील एकाला तीन दिवसांपासून सर्दी आणि ताप आहे. यामुळे 5 मृतकांसहित सर्व 18 लोकांचे स्वॅब घेण्यात आले असून सर्वांची कोरोना तपासणी केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...