आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 5 Members Of The Same Family Commit Suicide Due To Debt Burden In Bihar, Latest News And Update

कर्जाने घेतला कुटुंबातील 5 जणांचा जीव:बिहारमध्ये पती-पत्नी, आजी, 2 मुलांनी घेतला गळफास, आजोबांनीही केली होती आत्महत्या

समस्तीपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात एकाच कुटुबांतील 5 सदस्यांचे मृतदेह आढळलेत. हे सर्व मृतदेह छताला लटकलेल्या स्थितीत आढळलेत. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, काहीजण हा आत्महत्येचा, तर काहीजण हत्येचा प्रकार असल्याचा दावा करत आहेत.

विद्यापती नगर पोलिस ठाणे क्षेत्रातील मऊ धनेशपूर दक्षिण गावात ही घटना घडली आहे. रविवारी सकाळी शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता या घटनेचा खुलासा झाला. स्थानिकांनी कुटुंबाने कर्जाच्या ओझ्यामुळे स्वतःला संपवल्याचा दावा केला आहे. पण, पोलिस हत्या व आत्महत्या या दोन्ही बाजूंनी चौकशी करत आहेत.

पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत. त्यांनी पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेत. डीएसपी दिनेश कुमार पांडे यांनी या प्रकरणी काही जणांची चौकशी केली जात असल्याचे सांगितले. हत्या व आत्महत्या, पोलिस दोन्ही बाजूंचा तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

5 मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले.
5 मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले.

मृतांत पती-पत्नी, आजी व 2 मुलांचा समावेश

मृतातं 42 वर्षीय मनोज झा, त्यांची पत्नी 38 वर्षीय सुंदरमणी देवी, मातोश्री 65 वर्षीय सीता देवी व मृत मनोजचा 10 वर्षीय मुलगा सत्यम व 7 वर्षीय पुत्र शिवमचा समावेश आहे. काही जणांनी या घटनेवर संशय व्यक्त करत पोलिसांकडे आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे.

कुटुंब आर्थिक तंगीचा सामना करत होते

एकाच कुटुंबातील 5 जणांनी गळफास घेतल्यामुळ परिसरात अनेक तर्कवितर्कांना उधान आले आहे. ग्रामस्थांच्या मते, कुटुंब कर्जात बुडाले होते. आर्थिक तंगीमुळे ते त्रस्त होते. या कर्जामुळेच त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपविली.

घटना उजेडात आल्यानंतर घराबाहेर मोठी गर्दी झाली होती.
घटना उजेडात आल्यानंतर घराबाहेर मोठी गर्दी झाली होती.

वडिलांनीही केली होती आत्महत्या

उल्लेखनीय बाब म्हणजे मनोज झा यांच्या वडिलांनीही यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांनी आपल्या मोठ्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता न आल्याने त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या मुलाने आपल्या बहिणीचा विवाह एका मंदिरात केला होता.

बातम्या आणखी आहेत...