आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 5 MLAs Of JDU In BJP, Is This Constitutional, Nitish's Question To PM | Manipur Politics Crisis Update

मणिपुरात बंडखोरी:जेडीयूचे 5 आमदार भाजपमध्ये, हे संविधानिक आहे का, नितीश कुमार यांचा पंतप्रधान मोदींना प्रश्न

इंफाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या सत्ताधारी जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठीकीपूर्वी पक्षाला झटका बसला आहे. मणिपूरमध्ये त्यांच्या ६ पैकी ५ आमदारांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पक्ष सोडणाऱ्यांमध्ये के.एच. जॉयकिशन, एन. सनाते, मोहंमद अछब उद्दीन, माजी पोलिस महासंचालक ए.एम. खाउटे, थांगजाम अरूण कुमार यांचा समावेश आहे. जेडीयूने यंदा मार्चमध्ये मणिपूर विधानसभा निवडणुकीत ३८ जागी उमेदवार उतरवले होते. त्यापैकी ६ जणांचा विजय झाला होता.

आमदारांनी पक्षांतर केल्यावरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर हल्लाबोल केला. नीतिश म्हणाले, रालोआतून बाहेर पडल्याने मणिपूरचे आमचे सहा आमदार येऊन भेटले. त्यांनी आम्हाला जेडीयूसोबत असल्याचे आश्वासन दिले. म्हणूनच काय होत आहे, याबद्दल विचार करण्याची गरज आहे. ते लोक आमदारांना पक्षांतून फोडू लागले आहेत. हे संविधानिक आहे का? विरोधी पक्ष २०२४ साठी एकजूट झाल्यास केंद्रातील भाजप सरकार सत्तेवरून जाऊ शकते.

बिहारला जेडीयूमुक्त करतील लालू : सुशील मोदी

या प्रकरणावर माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी म्हणाले, अरुणाचलनंतर मणिपूरही जेडीयूमुक्त झाले. लवकरच लालू बिहारला देखील जेडीयूमुक्त करतील. अलीकडेच अरुणाचलमध्ये जेडीयूचे आमदार भाजपमध्ये गेले होते. त्यावर पलटवार करताना जेडीयूचे अध्यक्ष राजीव रंजन म्हणाले, अरूणाचल व मणिपूरमध्ये जेडीयूने भाजपला पराभूत करून विजय मिळवला होता, हे लक्षात घ्यायला हवे. जेडीयूपासून मुक्तीचे स्वप्न पाहू नका.

बातम्या आणखी आहेत...