आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 5 People Of Same Family Killed In Ayodhya, Land Dispute Was Going On Between Uncle And Nephew

एकाच कुटुंबातील 5 जणांचा निर्घृण खून:संपत्तीच्या वादात सख्ख्या भाच्चाने मामा-मामीसह तीन चिमुकल्यांचा चिरला गळा

अयोध्या2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फरार आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पाच पथक रवाना

उत्तर प्रदेशातील अयोध्येतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने शनिवारी मध्यरात्री आपल्या सख्ख्या मामा-मामी आणि त्यांच्या तीन लहान मुलांची गळा चिरून हत्या केली आहे. या कृत्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी पाच पथकांना रवाना केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येजवळील निसारु गावात रमेश कुमार आणि त्यांचा भाच्चा एकाच घरात राहत होते. संपत्तीवरुन मामा-भाच्च्यात मागील अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. शनिवारी मध्यरात्री भच्च्याने मामा राकेश कुमार आणि मामी ज्योती यांची गळा चिरून हत्या केली. यानंतर आरोपीला थोडीसुद्धा दया आली नाही आणि त्याने 4 आणि 8 मुलांचा (एक मुलगी आणि दोन मुले) गळा चिरला. यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अनुज कुमार झा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. ते म्हणाले की, या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास केला जाईल आणि कुणाचीही गय केली जाणार नाही.

बातम्या आणखी आहेत...