आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 5 Percent Genome Sequencing Is Required For Infection Control, Up From 0.10% In The Country; News And Live Updates

कोरोनाला कसे हरवणार?:संक्रमण नियंत्रणासाठी 5 टक्के जीनोम सिक्वेन्सिंग गरजेचे, देशात 0.10% होतेय; जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये भारत मागे, याद्वारेच व्हेरिएंटची ओळख

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: अनिरुद्ध शर्मा
  • कॉपी लिंक
  • भारतात जीनोम सिक्वेन्सिंगचा रिपोर्ट 2 महिन्यांनंतर येतो, अमेरिका-ब्रिटनमध्ये फक्त २ आठवडे लागतात

कोरोनाचे संक्रमण किती वेगाने होणार हे त्याच्या व्हेरिएंटवर विसंबून आहे. नवीन व्हेरिएंट किती वेगाने बदल आहे, देशातील कोणकोणत्या भागात पसरत आहे आणि ते किती धोकादायक आहे याबाबत सर्वकाही जाणून घेण्यासाठी आम्हाला दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लागत आहे. याच कारणामुळे डेल्टा व्हेरिएंटमुळे दोन-अडीच महिन्यांपूर्वी जे मृत्यू झाले त्यांची शहानिशा आता होत आहे. मात्र दुसरीकडे अमेरिका-ब्रिटनसारख्या देशांत केवळ दोनच आठवड्यांत नव्या व्हेरिएंटविषयी सर्वच माहिती दुनियाला दिली जाते, जेणेकरून दुसरे देश सावध होऊन त्याचा सामना करण्याची तयारी करू शकतील.

भारतात जीनोम सिक्वेन्सिंगचे परिणाम उशिरा मिळण्याबरोबरच त्याचे नमुनेही अत्यंत कमी जमवले जात आहेत. भारताने आजवर जागतिक स्तरावर फक्त २९,७९२ नमुन्यांचे सिक्वेन्सिंग शेअर केले आहेत. याचे प्रमाण भारतातील एकूण रुग्णांच्या ०.१०% इतके आहे. तथापि, जागतिक आरोग्य संघटनेने कमीत कमी ५ टक्के प्रकरणांत सिक्वेन्सिंग गरजेचे असल्याचे निर्देश दिले होते. ब्रिटनने १०% हून अधिक सिक्वेन्सिंग शेअर केले अाहेत. चिंतेची बाब म्हणजे सिक्वेन्सिंगमध्ये भारत एकूण रुग्णांच्या तुलनेत १३१ व्या स्थानी आहे.

याचे मोठे कारण
भारताकडे जेवढी एकूण क्षमता आहे तेवढी अमेरिकेत केवळ १० लॅबकडे; ब्रिटनमध्ये १०.६% नमुन्यांचे सिक्वेन्सिंग झाले, हे प्रमाण डब्ल्यूएचओच्या दिशानिर्देशांपेक्षा दुप्पट.

ही मोठी चिंता
भारताने आतापर्यंत केवळ २९,७९२ नमुन्यांचे सिक्वेन्सिंग करून ते जगाला कळवले आहे. ही संख्या देशात नोंद झालेल्या ३ कोटींहून अधिक रुग्णांच्या तुलनेत केवळ ०.१०% आहे.

आता ही स्थिती
रोजच्या रुग्णसंख्येवरून अजूनही भारत संक्रमित देशांत दुसऱ्या स्थानी. मात्र धोकादायक व्हेरिएंटचा शोध घेण्याचा उपाय असलेल्या जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये जगात १३१ व्या स्थानी.

भारतात डेल्टा व्हेरिएंटमुळे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मृत्यूंना आता दुजोरा मिळत आहे, एवढा वेळ का लागतो?
सिक्वेन्सिंग तर १५-२० दिवसांतूच पूर्ण केले जाते, पण जर त्यात नवा म्यूटंट दिसला तर त्याला वैज्ञानिक दुजाेरा मिळण्यासाठी २ महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागत आहे. एखाद्या शहर किंवा जिल्ह्यात म्यूटंट होत असलेल्या व्हेरिएंटचा ट्रेंड पाहण्यासाठी त्याच ठिकाणाहून पुन्हा दोन वेळा नमुने घेतले जातात.

सॅम्पलिंग कसे होते?
एनसीडीसीला (नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल) रिपोर्ट करणारी जिल्हास्तरीय संस्था आयडीएसपी (इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्राम) नमुने निवडते. नंतर लॅबमध्ये नमुन्यातून व्हायरस आरएनए काढून तपासला जातो. डेटाबेसशी जोडून हा नवा व्हेरिएंट तर नाही ना हे पाहिले जाते. जेथून नमुने घेतले जातात तेथे लक्ष ठेवले जाते. त्याद्वारे संसर्ग जास्त पसरत आहे की कमी हे कळते.

सिक्वेन्सिंग कुठे-कुठे होते?
देशात ३०० सेंटिनल सेंटर आहेत. तेथे एकत्रित केलेले नमुने देशभरातील २८ सिक्वेन्सिंग लॅबमध्ये पाठवतात.

सिक्वेन्सिंग कोणत्या गतीने होते?
नव्या म्यूटंटची ओळख पटवण्यापासून त्याचे व्हेरिएंट ऑफ कन्सर्न तयार होण्यापर्यंत खूप वेळ लागतो. अल्फा व्हेरिएंटच्या प्रकरणात ४ महिन्यांचा वेळ लागला होता.

देशात सिक्वेन्सिंगची किती क्षमता आहे?
सुरुवातीला जिनोम सिक्वेन्स करण्याची क्षमता दरमहा ३० हजार होती. तेव्हा १० लॅब होत्या. आता २८ लॅब आहेत. क्षमताही याच प्रमाणात वाढली आहे.

देशात किती व्हेरिएंट मिळाले आहेत?
आतापर्यंत घेतलेल्या ६५ हजार नमुन्यांपैकी ४५ हजारांचे विश्लेषण झाले आहे. तथापि, २९,९७२ चेच सिक्वेन्सिंग इतर देशांशी शेअर केलेे. यात १०० वर व्हेरिएंट मिळालेत. त्यापैकी अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टाच व्हेरिएंट ऑफ कन्सर्नच्या श्रेणीत आहेत.

भारतात किती जीनोम सिक्वेन्सिंगचे लक्ष्य आहे?
डिसेंबरपर्यंत ५% च्या सिक्वेन्सिंगचे लक्ष्य आहे.

अमेरिका-ब्रिटनसारख्या देशांत कसे होतेय काम?
अमेरिका-ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात सिक्वेन्सिंग होत आहे. भारतात सिक्वेन्सिंगची जेवढी एकूण क्षमता आहे, तेवढी अमेरिकेच्या १०-१२ लॅबमध्ये आहे. तेथे अशा १०० वर लॅब आहेत. अमेरिका-ब्रिटनमध्ये सिक्वेन्सिंगद्वारे नव्या व्हेरिएंटची ओळख फक्त दोन आठवड्यांत होत आहे. भारतात दोन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...