आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तांत्रिक मंदीतून बाहेर पडला देश:GDP मध्ये 0.4% ची वाढ तर GST कलेक्शनने बनवला विक्रम, तिसर्‍या तिमाहीच्या तेजीची ही आहेत 5 कारणे

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलग दोन तिमाही घसरणीनंतर तिसर्‍या तिमाहीत सकारात्मक वाढ झाली
  • फेब्रुवारी महिन्यात जवळपास तीन लाख मोटारी देशांतर्गत बाजारात विकल्या गेल्या

कोविड-19 चा भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. याचे कारण चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत अर्थव्यवस्थेत घट झाली आहे. यामुळे देशात मंदी होण्याचा धोका होता. परंतु अनलॉकनंतर आर्थिक क्रिया सतत सुधारत आहे. अलीकडील विविध क्षेत्रांच्या सकारात्मक परिणामांवरुन हे संकेत हे स्पष्ट झाले आहेत. हे संकेत हे स्पष्ट करतात की अर्थव्यवस्था प्री-कोविड पातळीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे आणि मंदीचा धोका टाळला गेला आहे.

तिसऱ्या तिमाहीत GDP मध्ये 0.4% ची वाढ
चालू आर्थिक वर्ष 2020-21 ची तिसरी तिमाही म्हणजेच अक्टोबर-डिसेंबर तिमाहीमध्ये देशाच्या GDP मध्ये 0.4% ची वाढ झाली आहे. सरकारी आकड्यांनुसार, या तिमाहीमध्ये देशाच्या अंदाजे GDP 36.22 लाख कोटी रुपये राहिली आहे. निवेदनात म्हटले आहे की निर्यातीत आणि कारखान्याच्या कामकाजात वाढ झाल्यामुळे जीडीपीमध्ये सकारात्मक वाढ झाली आहे.

आकड्यांमध्ये जानेवारीमध्ये व्यवसाय क्रियाकलापमध्ये रिकव्हरी झाल्याचे सांगितले आहे. मात्र सरकारने चालू आर्थिक वर्षात देशाच्या GDP मध्ये 8% घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP 23.9% आणि दुसऱ्या तिमाहीत 7.5% ने घटला होता.

फेब्रुवारीमध्ये पॅसेंजर कारच्या विक्रीमध्ये 23% ची वाढ
आर्थिक हालचालींबरोबरच फेब्रुवारीमध्ये प्रवासी कार विक्रीतही 23% वाढ झाली आहे. देशातील पहिल्या दहा कार निर्माता कंपन्यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये 2,98,694 वाहनांची विक्री केली. फेब्रुवारी 2020 मध्ये या कंपन्यांनी 2,41,533 वाहनांची विक्री केली. या टॉप -10 कार निर्मात्यांचा एकूण देशांतर्गत कार बाजाराच्या 97% वाटा आहे.

GST कलेक्शन सलग पाचव्या महिन्यात 1 लाख कोटी रुपयांच्या पार
2021 फेब्रुवारी मधील GST कलेक्शन 1.13 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. GST यंत्रणेच्या अंमलबजावणीनंतरची ही पहिलीच वेळ आहे जेव्हा सलग पाच महिन्यांपर्यंत जीएसटी कलेक्शनने 1 लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला. आर्थिक घडामोडीत वाढ आणि बनावट बिलांवर कठोरपणा वाढल्यामुळे GST कलेक्शनमध्ये वेग आला आहे. याशिवाय GST प्रणालीअंतर्गत होणारी गळती रोखण्यासाठी सरकार अत्यंत कठोर पावले उचलत आहे.

विदेशी गुंतवणूकदारांनी 1.87 लाख कोटींची केली गुंतवणूक
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) भारतीय इक्विटी बाजारात सातत्याने गुंतवणूक करत आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून FII निव्वळ गुंतवणूकदार आहेत. या महिन्यांत FII ने भारताच्या इक्विटी बाजारात 1.87 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यापैकी फेब्रुवारी महिन्यात 25,787 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

पेट्रोल-डिझेलचा वापर पूर्व-कोविड स्तरावर पोहोचला
देशात पेट्रोल-डिझेलचा वापर प्री-कोविड स्तराच्या जवळपास पोहोचला आहे. यावरुन संकेत मिळतो की, आर्थिक घडामोडींमध्ये सुधारणा होत आहे. फेब्रुवारी महिन्यात सरकारी तेल कंपन्यांनी 2219 TMT पेट्रोल विकले आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये 2264 पेट्रोल विकले गेले होते. त्याचप्रमाणे डिझेलचा वापर फेब्रुवारी 2020 च्या 6356 TMT च्या तुलनेत 5811 TMT राहिला आहे.

पुढच्या वर्षी तेल विक्रीमध्ये 9.8% वाढीची अपेक्षा
पुढील वर्षी मार्च 2022 पर्यंत देशात तेलाच्या वापरामध्ये 9.87% वाढ अपेक्षित आहे. असे झाल्यास गेल्या 6 वर्षातील ही सर्वाधिक वाढ होईल. सरकारने प्राथमिक अंदाजात असे सांगितले आहे. सरकारने असे म्हटले आहे की पुढील आर्थिक वर्षात देशात 215.24 दशलक्ष टन शुद्ध इंधन वापरले जाऊ शकते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांत म्हणजेच एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या काळात तेलाच्या वापरामध्ये 13.5% घट झाली आहे. कोरोनामुळे लॉकडाउन लावल्यामुळे वापर कमी झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...