आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 5 State Assembly Election 2022 | BJP Appoints Central Inspectors Of 4 States; Union Home Minister Amit Shah Has The Responsibility Of Uttar Pradesh | Marathi News

भाजपचे सत्तास्थापन:भाजपने 4 राज्यांचे केंद्रीय निरीक्षक नेमले; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीने सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला पंजाबसोडून इतर चार राज्य उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवामध्ये मोठे यश मिळाले आहे. आता भाजपने या राज्यांमध्ये सरकार स्थापनेसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी केंद्रीय नेते राज्यांमध्ये पाठवले जाणार असून मंत्र्यांच्या नावावरही चर्चा होऊ शकते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रघुवर दास यांना उत्तर प्रदेश या राज्यासाठी निरिक्षक बनवण्यात आले आहे. उत्तराखंडमध्ये राजनाथ सिंह आणि मिनाक्षी लेखी तर मणिपूरमध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांची निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नरेंद्र सिंह तोमर आणि एल मुरुगन यांना गोव्यासाठी निरिक्षक बनवण्यात आले आहे. या सर्व राज्यांपैकी गोवा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण, गोवा विधानसभा ही 40 सदस्यांची असून कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. मात्र, 20 जागा जिंकून भारतीय जनता पक्ष गोव्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याने भाजप गोव्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र असे असतानाही भाजपने आतापर्यंत सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. गोवा विधानसभेच्या 40 जागांपैकी एकट्या भाजपने 20 जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्र गोमंतक पार्टीच्या दोन आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे गोव्यात भाजपचे सरकार सहजपणे स्थापन होऊ शकते.

तोमर आणि मुरुगन गोव्याचे निरिक्षक
नरेंद्र सिंह तोमर आणि एल मुरुगन यांना गोव्याच्या सरकार स्थापनेसाठी भाजपने निरिक्षक बनवले आहे. सत्तास्थापना होई पर्यंत नरेंद्र सिंह तोमर आणि एल मुरुगन यांना विशेष जबाबदारी भाजपने दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...