आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5 राज्यांचा आखाडा:बंगाल : भाजप विनाचेहरा मैदानात, तामिळनाडूमध्ये स्वकीयांशी झुंज!

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंत्री स्मृती इराणी यांनी बंगालमध्ये स्कूटर रॅली काढून ममतांना उत्तर दिले. - Divya Marathi
मंत्री स्मृती इराणी यांनी बंगालमध्ये स्कूटर रॅली काढून ममतांना उत्तर दिले.

तारखा जाहीर होताच बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये राजकीय पारा उसळला, तेथील विशेष वृत्तांत आणलाय भास्करच्या प्रतिनिधींनी ...

तामिळनाडू : विवनास्टार पहिल्यांदाच होतेय विधानसभेची निवडणूक
सुनीलसिंह बघेल, तामिळनाडूच्या चेन्नईहून
दक्षिण भारतात निवडणुकीतील सर्वात रंजक आखाडा तामिळनाडूत रंगतो. गेल्या ५५ वर्षांत येथील राजकीय दंगलीचे नियम आणि कायदेही चित्रपट तारे-तारका निश्चित करत आले आहेत. गेल्या ४० वर्षांहून जास्त वेळा एमजी. रामचंद्रन यांचा वारसा चालवणाऱ्या जयललिता यांच्या एआयडीएमके सत्तेत राहिली. अण्णादुराईच्या द्रविड राजकारणाचा वारसा चालवणारे करुणानिधी यांचा डीएमके पक्ष आहे. १९६७ नंतर एखाद्या राष्ट्रीय पक्षाचे सरकार सत्तेवर आले. यंदा भाजप-काँग्रेससारखे राष्ट्रीय पक्ष, या दोन्ही पक्षांच्या धाकट्या भावाच्या भूमिकेत आहेत. तर्कवितर्क मोडून सत्तेवर आलेल्या एआयडीएमकेकडे यंदा करिष्मा करणारा चेहरा अर्थात जयललिता नाहीत. डीएमकेकडेही द्रविड राजकारणाव्यतिरिक्त चेहरा नाही. रजनीकांत यांनी एक पाऊल पुढे टाकून रहस्यमय पद्धतीने माघार घेतली. कमल हासनदेखील आपला ‘रंग’ निश्चित करू शकलेले नाहीत. भलेही तामिळनाडूतील ८८ टक्के लाेकसंख्या हिंदू असली तरी भाजपला येथे राजकीय आखाड्यात हिंदी-हिंदू असे मुद्दे मांडण्यात यश आलेले नाही.

शशिकलांवर ‘राम-लक्ष्मणा’ची जोडी :
जयललिता यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या उत्तराधिकारी शशिकला यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चार वर्षे तुरुंगात काढावी लागली. एकूण २३४ विधानसभा जागांपैकी १२४ जागा संपादन करून पक्ष दुसऱ्यांदा सत्तेवर आला होता. शशिकला यांच्या प्रभावामुळेच पलानीसामी (ईपीएस) मुख्यमंत्री झाले. पनीरसेल्व्हम (आेपीएस) उपमुख्यमंत्री झाले. मात्र चित्र वेगाने बदलले आणि शशिकला यांना सरचिटणीसपदावरून हटवण्यात आले होते. एवढे जगजाहीर असूनही त्यांच्यातील वाद एका माजी मंत्र्यांनी नाकारला. ती तर राम-लक्ष्मणाची जोडी आहे. फेब्रुवारीत तुरुंगात बाहेर आलेल्या चिन्नम्मा यांनी अम्मांच्या खऱ्या वारसदार आपणच असल्याचा दावा केला. शशिकला यांनी पक्षाची स्थापना केली. परंतु भाचे टीटीव्ही दिनाकरन मात्र अम्मा मक्कल मुनेत्र कळघम ( एएमएमके) हा झेंडा घेऊन मैदानात आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत ५.२५ टक्के तर पोटनिवडणुकीत ७.२ टक्के घेऊन एआयडीएमकेसाठी आव्हानही देणारा पक्ष ठरला होता. एआयडीएमकेसोबत आघाडी करणाऱ्या भाजपसाठी दोन गटांना एकत्र आणण्याचे आव्हान आहे.

बंगाल : पूजेच्या मंडपांतही राजकारण, तपासाचा भुंगा लावू, परस्परांना इशारे
विशाल पाटडिया, प. बंगालच्या कोलकाताहून

पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील आश्वासनांच्या खूप आधीपासूनच राजकीय रस्सीखेच करण्यासाठी मैदान सज्ज झाले आहे. शुक्रवारी आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर राजधानी कोलकातामध्ये जणू उत्साह संचारल्यासारखे चित्र दिसतेय. दोन वर्षांपूर्वी बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची फोडफोड करून नियम भंगाची परंपरा आधीच सुरू केली. भाजपने या निवडणुकीत आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलच्या काही मोठ्या नेत्यांचे पक्षांतर झाले. ते आक्रमक झाले. पक्षांतरादरम्यान प्रतिस्पर्धी दुर्गा पूजन पंडाल, विवेकानंद-रविंद्रनाथ टागोर-नेताजी जयंतीपासून सीबीआय-सीआयडीची कारवाई करू अशा परस्पर धमक्याही दिल्या जात आहेत. ध्रुव्रीकरणाचे राजकारण,भ्रष्टाचारासारख्या मुद्यांवर गल्लोगल्ली चर्चा रंगू लागली आहे. तृणमूल ‘जय बांगला’ व भाजप ‘सोनार बांगला’ मोहिमेत व्यग्र आहे. आश्वासनांची स्पर्धा नसून विविध विधानांचा कलगितुरा रंगू लागला आहे.

सीबीआय विरुद्ध सीआयडी : बंगालमध्ये भाजप नेत्या पामेला गोस्वामी यांना कोकेन प्रकरणात अटक केल्यानंतर बंगाल पोलिसांनी भाजप नेते राकेश सिंह यांनाही अटक केली आहे. सीबीआयने अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीला कोळसा तस्करी घोटाळ्यात नोटीस जारी केली आहे. तृणमूलने केंद्रावर सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे तर राज्य सरकार सीआयडीचा गैरवापर करत असल्याची भाजपची टीका आहे.

‘तोलाबाज व दंगाबाज’ : तृणमूल व भाजप नेत्यांमधील कटुतेचा अंदाज त्यांच्या विधानांवरून येऊ शकतो. भाजपचे नेते तृणमूल नेते ‘तोलाबाज’ म्हणू लागले आहेत. म्हणजे तृणमूलचे नेते प्रत्येक भ्रष्टाचाराच्या कामात आपला वाटा मागतात. त्यावर ममता भडकल्या. त्यांनी एका जाहीर सभेत पंतप्रधान ‘दंगाबाज’ असल्याचे शब्द वापरले. अभिषेक यांची मुलगी सोबत ममतांनी ‘बंगालला राज्याची लेक हवीये..’ अशी घोषणा दिली आहे. त्याआडून त्यांनी स्थानिक विरुद्ध बाहेरचे लोक असा मुद्दा छेडला होता. अभिषेक यांच्या पत्नीला नोटीस दिल्यानंतर ममतांनी भाजपवर आगपाखड केली. भाजपचा मुलींना विरोध आहे. सीबीआय चौकशीच्या आधी अभिषेक यांच्या मुलीसोबत ममतांचे छायाचित्र खूप व्हायरल झाले. त्यातून ममतांनी भाजपचा मुलींना विरोध असल्याचा प्रयत्न केला.

बातम्या आणखी आहेत...