आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज यूपीच्या ५९, पंजाबच्या पाच राज्यांतील निवडणुकीतील सर्वात मोठा टप्पा रविवारी पार पडत आहे. यात पंजाबच्या सर्व ११७ जागा आणि उत्तर प्रदेशातील ५९ विधानसभा जागांसाठी मतदान होईल. यूपीच्या ४०३ जागांसह गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभेच्या एकूण ६९० जागांसाठी १० फेब्रुवारीपासून मतदान सुरू आहे. रविवारी ३९९ जागांवरील म्हणजे सुमारे ५८ टक्के जागांवर मतदान पूर्ण होईल. यानंतर यूपीत चार टप्प्यांत २३१ व मणिपूरच्या दोन टप्प्यांतील ६० जागा अहोत.
२०१७ मध्ये काँग्रेस पक्ष फक्त पंजाबमध्ये सरकार स्थापन करू शकला होता. यंदा मात्र तेथे आव्हान आहे. भाजप व अकाली दल प्रथमच वेगळे लढत आहेत. येथे मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे अमरिंदरसिंग आता भाजपसोबत आहेत.
ग्राउंड रिपोर्ट : केंद्रीय मंत्री टेनींच्या बालेकिल्ल्यात लोकांचे मौन, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचीही मतदारसंघाकडे पाठ
लखीमपूरहून तिकुनियाकडे जाताना हिरवीगार शेती पाहून हा परिसर अगदी मिनी पंजाबसारखा दिसतो. तिकुनियात झालेल्या हिंसाचारास अजून लोक विसरले नसल्याचे जाणवले. लोक निवडणूक किंवा हिंसाचारावर बोलण्याचे टाळतात. येथे चौथ्या टप्प्यात २३ फेब्रुवारीला मतदान होत आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचा हा बालेकिल्ला. त्यांचा मुलगा आशिष याने काही शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. मृत निदर्शक लवप्रीत याचे वडील सतनाम म्हणाले, ८ लोकांच्या मारेकऱ्याला जामीन मिळाला, इतर शेतकऱ्यांची मात्र सुनावणी सुरू आहे. निघासन हे लखीमपूर खिरीच्या ८ विधानसभा जागांपैकी एक आहे. २०१२ मध्ये टेनी येथील आमदार होते. नंतर २०१४ व २०१९ मध्ये ते खासदार झाले. आशिष निघासनमधून निवडणूक लढवू इच्छित होते. आता भाजपने येथून आमदार शशांक शर्मा यांना तिकीट दिले आहे. स्थानिकांनुसार, टेनी सध्या निघासनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. शिवाय निघासन किंवा लखीमपूर खिरी येथे भाजपचे इतर नेतेही पोहोचलेले नाहीत.
पीडित, साक्षीदार सरकारी सुरक्षेत
लखीमपूरच्या तिकुनियात झालेल्या हिंसाचारानंतर सुप्रीम कोर्टाने ९० साक्षीदार व मृतांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले. मृतांच्या घराजवळ आता सुरक्षा जवान दिसतात. निघासनहून तिकुनियाला जाताना अनेक दुचाकींवर मागे सुरक्षा जवान बसलेले दिसतात. यातील एक जसपाल पल्ला म्हणतात, गार्ड असूनही मी असुरक्षित आहे.
यूपीत करहल हॉट सीट : तिसऱ्या टप्प्यात १६ जिल्ह्यांतील ५९ जागांवर मतदान होत आहे. मैनपुरीच्या करहल जागेवर रस्सीखेच असून येथे सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव व भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री एस. पी. बघेल मैदानात आहेत. गेल्या वेळी ५९ पैकी ४९ जागा भाजप, तर ९ जागा सपाकडे होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.