आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनलॉकची तयारी:1 जूनपासून 5 राज्ये अनलॉक, यूपीत 82 टक्के रुग्ण कमी, पॉझिटिव्हिटी दर 22 टक्क्यांहून 1 वर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान व केरळचा समावेश; पहिल्या टप्प्यात फळे, भाजी-किराणा इत्यादी गोष्टींना प्राधान्य

देशात काेरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सोमवारपासून अनलॉकची सुरुवात होणार आहे. देशातील पाच राज्यांत एक जूनपासून लॉकडाऊन मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यात दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान व केरळचा समावेश आहे. छत्तीसगडच्या अनेक जिल्ह्यांत अनलॉकची सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळी ५ पासून राजधानी दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात अनलॉकची सुरुवात होईल. बहुतांश राज्यांत हळूहळू अनलॉकची व्याप्ती वाढवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात किराणा, फळ व भाज्या इत्यादी सामानाची दुकाने सुरू केली जाणार आहेत. काही राज्यांत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगालचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये ८ जून व पश्चिम बंगालमध्ये १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढला आहे. बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने पाच राज्यांत अनलॉक लागू केला जाणार आहे. यूपीत २४ एप्रिलला रुग्णसंख्या उच्चांकी होती. परंतु गुरुवारी ३४५४ रुग्ण आढळून आले. दिल्लीत २० एप्रिलला २८३९५ रुग्ण आढळले होते. २७ मे रोजी केवळ १०७२ संख्या होती. मध्य प्रदेशात २५ एप्रिलला सर्वाधिक १३६०१ रुग्ण आढळले होते. २७ रोजी १९७७ रुग्ण आढळले. राजस्थानातही संख्या घटत आहे.

मध्यप्रदेश: सलून, किराणा, दुकानांना सवलत, हॉटेलवर निर्णय बाकी
मध्य प्रदेशात पहिल्यात टप्प्यात सलून, किराणा दुकानांसह फळे व भाजीपाल्याच्या दुकानांना सवलत दिली जाऊ शकते. रेस्तराँ, हॉटेल तूर्त बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री विश्वास सारंग यांनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. लवकरच अनलॉकच्या योजनेला अंतिम रूप दिले जाणार आहे. खासगी कंपनी, शाळा, समारंभांत लोकांची संख्या व बांधकाम साहित्यासह इतर अनेक क्षेत्रे सुरू करण्याचाही विचार केला जात आहे. अनलॉकमध्ये रात्रीची संचारबंदीवर तूर्त चर्चा नाही.

यूपी: विवाहाचे सामान, गारमेंट्स, फळ-भाजी, किराणा सुरू राहणार
उत्तर प्रदेशात एक जूनपासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन मागे घेतला जाऊ शकताे. अनेक गोष्टींसाठी सवलत मिळणार आहे. परंतु वीकेंड व रात्रीची संचारबंदी सुरूच राहू शकते. २३ कोटी लोकसंख्येच्या उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांचे प्रमाण ८२ टक्क्यांहून कमी झाले आहे. संसर्गाचा दर २२ टक्क्यांहून एकवर आला. अनलॉकमध्ये विवाह साहित्य विक्री करणारी दुकाने, गारमेंट्स, किराणा, फळे‘भाजीपाला, बांधकाम मजुरांना परवानगी मिळेल. कंटेनमेंट झोनमधील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

राजस्थान: मिनी अनलाॅकच्या पहिल्या टप्प्यात मर्यादित संख्येत दुकाने सुरू
राजस्थान सरकारने १ जूनपासून अनलॉक करण्याची याेजना आखली आहे. त्याला मिनी अनलॉक नाव देण्यात आले आहे. त्यात जास्त सवलत मिळणार नाही. पहिल्या टप्प्यात मर्यादित दुकाने सुरू होतील. त्यात खाद्यपदार्थ, दूध, फळ-भाजीपाला, किराणाचा समावेश असेल. एका शहरातून दुसऱ्या शहरात व एका गावातून दुसऱ्या गावात येण्या‘जाण्यावरील बंदी हटवली जाऊ शकते. खासगी वाहनांना सशर्त परवानगी दिली जाऊ शकते. प्रवासाला सवलत मिळाल्यास बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत होतील.

दिल्ली: सोमवारपासून बांधकाम, कारखाने सुरू करण्याचे आदेश
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन अनलॉक करण्याचे जाहीर केले. हळूहळू लॉकडाऊन मागे घेण्यात येईल. पण रुग्ण वाढू नयेत म्हणून मेट्रो सेवा सुरू होणार नाही. काेट्यवधी लोकांच्या कष्टामुळेच संसर्गाचा दर १.५ टक्के एवढा कमी आला आहे.दिल्लीत एक आठवड्यासाठी बांधकाम मजूर व कारखान्यास परवानगी दिल्ली आहे.दिल्ली सरकारने व्यापक पातळीवर लसीकरण तसेच दक्षतेसाठी यंत्रणा राबवली आहे. त्यामुळे परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...