आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी पहाटे तीन दहशतवादी ठार झाले. त्यापैकी दोन कुपवाडा आणि एक पुलवामा जिल्ह्यात चकमकीत ठार झाला आहे. गेल्या 24 तासांत सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तीन चकमक झाल्या. यात 7 दहशतवाद्यांना लष्कराने ठार केले आहे. रविवारी कुपवाडा आणि कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी मारले गेले होते.
पुलवामामध्ये सर्च दरम्यान दहशतवाद्यांचा गोळीबार
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पुलवामाच्या चटपोरा भागात सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला असून, कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कुपवाडा आणि कुलगाममध्ये 4 दहशतवादी ठार
कुपवाडा आणि कुलगाममध्ये रविवारी सुरक्षा दलांनी केलेल्या दोन चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. कुपवाडा चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले, त्यापैकी एक पाकिस्तानी आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता. लष्कराने नुकतेच अटक केलेल्या दहशतवादी शौकत अहमद शेख याच्याकडून माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी कुपवाडा ऑपरेशन सुरू केले होते.
कुलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवादी ठार
कुपवाडा व्यतिरिक्त कुलगाममधील दमहल हांजी पोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. येथेही दोन दहशतवादी मारले गेले आहेत. यामध्ये एक दहशतवादी पाकिस्तानी होता.
या वर्षात आतापर्यंत 114 दहशतवादी मारले गेले आहेत
सुरक्षा दलांनी खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑलआउट सुरू केले आहे. या वर्षात आतापर्यंत 32 परदेशींसह 114 दहशतवादी मारले गेले आहेत. अलीकडेच, अनंतनाग जिल्ह्यातील हंगलगुंड भागात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी मारले गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.