आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखीमपूर खिरीत जीपखाली चिरडून ४ शेतकऱ्यांच्या हत्येच्या प्रकरणात एसआयटीने सोमवारी आरोपपत्र दाखल केले. घटनेच्या ८८ दिवसांनी सोमवारी मुख्य न्यायालयीन मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात ५,००० पानांचे आरोपपत्र दाखल केले. यात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचे पुत्र तथा मुख्य आरोपी आशिष मिश्र मोनू याच्यासह टेनी यांचे मेहुणे वीरेंद्र शुक्ला याचेही नावे आहे. पलिया ब्लाॅक प्रमुख शुक्लाला पोलिसांनी पुरावे नष्ट करण्याचा आरोपी केले आहे. आराेपपत्रात शेकडो व्हिडिओ फुटेज, सीसीटीव्ही फुटेज व फोन कॉल्सच्या डिटेल्स तसेच २०८ साक्षीदार आहेत.
एसआयटीने आरोपपत्रात म्हटले आहे की, घटनेच्या वेळी आशिष घटनास्थळीच होता. बॅलेस्टिक रिपोर्टच्या आधारे आशिष व त्याचा मित्र अंकित दासच्या परवानाप्राप्त शस्त्रांनी गोळीबार झाल्याचे सिद्ध झाले आहे. आरोपपत्रात म्हटले आहे की, वीरेंद्रचे वाहन घटनास्थळी होते, मात्र त्याने ही बाब लपवली. आरोपपत्रात १७ जणांची नावे आहेत. मुख्य आरोपी आशिषसह १३ लोक तुरुंगात आहेत. शुभम बाजपेयी, श्यामसुंदर निषाद व जीपचालक हरिओमचा मृत्यू झालेला आहे. जमावाच्या मारहाणीत हरिओमचा मृत्यू झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.