आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन नियम:5 वर्षांच्या मुलांनाही टू-व्हीलरवर हेलमेट घालणे बंधनकारक, नियम मोडल्यास तीन महिने लायसेंस रद्द

बंगळुरूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रॅफीक नियम मोडणाऱ्यांविरोधात कर्नाटक सरकार कडक पाऊले उचलण्याच्या तयारीत आहे. कर्नाटक राज्य ट्रांसपोर्ट विभागाने टू-व्हीलरबाबत नवीन नियम बनवले आहेत. या नवीन नियमानुसार टू-व्हीलर गाडीवर बसणाऱ्या 4 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांनाच हेलमेट घालणे अनिवार्य असेल. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईअंतर्गत त्यांचे लायसेंस तीन महिन्यांसाठी रद्द केले जाईल.

सुप्रीम कोर्टाच्या रस्ते सुरक्षा समितीने 14 ऑक्टोबरला एक व्हिडिओ कॉन्फरंसिक आयोजित केली होती आणि ट्रॅफिक नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची शिफारस केली होती. यानंतर हेलमेटच्या नव्या नियमाला राज्यभर तात्काळ लागू करण्यात आले. नव्या नियमानुसार मोटारसायकल चालवणाऱ्या आणि मागे बसलेल्या व्यक्तीला हेलमेट घालणे बंधनकारक असेल. बंगळुरू ट्रॅफिक विभागातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, शहरात विना हेलमेट गाडी चालवणाऱ्यांची संख्या वाढली होती, यामुळेच नवीन नियम लागू करण्यात आला.